Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 16 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Top News

तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 16 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Smoke and destruction after a boiler explosion at a glue factory in Pakistan that killed at least 15 people

चेन्नई Explosion At Firecracker Factory : तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या माहितीनुसार, फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : ब्लॅकमेल करत दारू पाजून तिच्या हातातील धागा काढला, कपडे काढले

संपूर्ण प्रकरण काय :

मिळालेल्या माहितीनुसार, कट्टनार पट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या कारखान्यात आकर्षक फटाके बनवले जातात. हा कारखाना गोविंदनल्लूर येथील रहिवासी मुथू मणिकम यांच्या मालकीचा आहे. आज दुपारी, कामगार फटाक्यांना माळ घालत असताना कारखान्यात स्फोट झाला. यात 16 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विरुधुनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीमध्ये, आंध्र प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 21 जणांचा मृत्यू :

यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये, आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातही फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला होता. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला होता आणि 8 जण जखमी झाले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं होतं आणि म्हणाले, “काकीनाडा जिल्ह्यातील वेटलापलेम गावातील फटाके निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू होणे हे अत्यंत दुःखद आहे. आम्ही बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहोत आणि पीडित कुटुंबांना मदत करू.” त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली होती. जखमींचा वैद्यकीय खर्च सरकार उचलेल, असंही त्यांनी सांगितलं होतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे की देशात अनेक वेळा फटाक्यांच्या कारखान्यांतील स्फोटांमुळं अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळं, अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू करणं आवश्यक आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts