• Home
  • ताज्या बातम्या
  • तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये हेअरपिन वळणावर भीषण अपघात; 10 पर्यटकांचा मृत्यू, अनेकजण जखमी
गुन्हा

तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये हेअरपिन वळणावर भीषण अपघात; 10 पर्यटकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Scene of a serious road accident on the Dhule–Solapur Highway showing damaged vehicles, with reports of one person dead and another critically injured

Valparai Van Accident : तामिळनाडूच्या वलपराईमध्ये एक भीषण व्हॅन अपघात झाला. या घटनेत दहा पर्यटकांचा मृत्यू झाला. केरळमध्ये नोंदणीकृत असलेले हे पर्यटक वाहन वलपराई-पोल्लाची रस्त्यावरील 13व्या हेअरपिन वळणावर कोसळले. अपघाताच्या वेळी वाहनात 20 प्रवासी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

हेही वाचा : इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; व्हिडिओ जारी करत दिला मोठा

तीव्र वळणावर वाहनाचा अपघात :

ही घटना कोईम्बतूर जिल्ह्यातील वलपराई इथं घडली. एका पर्यटक वाहनाचा अपघात झाला, ज्यात वाहनातील 10 जणांचा मृत्यू झाला. रस्त्यावरील तीव्र वळणामुळं वाहन उलटलं आणि त्यामुळं हा अपघात झाला. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, वलपराई-पोल्लाची घाट रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ते 13व्या वळणापासून 9व्या वळणापर्यंत घसरलं.

व्हॅनमधले पर्यटक मलप्पुरमचे रहिवासी :

अपघातात व्हॅनचं मोठं नुकसान झालं. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हॅनमधले सर्वजण केरळमधील मलप्पुरमचे होते. मात्र, ते एकाच कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा ओळखीचे होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमींना योग्य उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. तपास सुरु आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात असून, त्यांना माहिती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघातात व्हॅन पूर्णपणे उद्ध्वस्त :

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बचाव आणि मदतकार्य सुरु झाले. अपघातात व्हॅन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पर्यटकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts