Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अखेर केकेआरचं विजयाचं खातं उघडलं; राजस्थानचा पराभव करत मिळवला पहिला विजय
क्रीडा

अखेर केकेआरचं विजयाचं खातं उघडलं; राजस्थानचा पराभव करत मिळवला पहिला विजय

यंदाच्या IPL हंगामात पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर; कोलकाताकडून लखनऊचा पराभव

कोलकाता KKR Beat RR : आयपीएल 2026 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सनं सहा सामन्यांनंतर अखेर राजस्थान रॉयल्सविरुद्ध चार गडी राखून विजय मिळवत आपलं खातं उघडलं. या विजयासह कोलकाताचे आता 7 सामन्यांत 3 गुण झाले आहेत. तर राजस्थानला हंगामातील दुसरा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत.

हेही वाचा : तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 16 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

राजस्थानची चांगली सुरुवात :

सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनं सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 20 षटकांत नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. राजस्थानचा फलंदाजीतील प्रमुख खेळाडू वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 46 धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालनं 39 धावा केल्या. तर उर्वरित फलंदाजांना अपयश आलं. त्यामुळं चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी तीन बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. सुनील नरेननंही दोन बळी घेतले.

केकेआरची खराब सुरुवात :

राजस्थाननं दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना पाच धावांवर असताना केकेआरचे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाल्यानं त्यांची निराशाजनक सुरुवात झाली. यानंतर, 37 धावांवर कॅमेरॉन ग्रीनच्या रुपानं केकेआरला तिसरा धक्का बसला. जेव्हा कोलकातानं 85 धावांवर आपली सहावी विकेट गमावली, तेव्हा त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग खूप कठीण वाटत होता. यानंतर, रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी मिळून सातव्या विकेटसाठी अवघ्या 37 चेंडूंमध्ये 76 धावांची भागीदारी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात रिंकूनं 53 धावा केल्या, तर रॉयनं नाबाद 29 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजानं 2 बळी घेतले, तर जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts