Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • IPL मध्ये आज गुजरात-मुंबई आमनेसामने; सलग चार पराभवानंतर MI पुनरागमन करणार?
क्रीडा

IPL मध्ये आज गुजरात-मुंबई आमनेसामने; सलग चार पराभवानंतर MI पुनरागमन करणार?

IPL मध्ये आज गुजरात-मुंबई आमनेसामने; सलग चार पराभवानंतर MI पुनरागमन करणार?

अहमदाबाद GT vs MI Match : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. म्हणजेच हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांच्यात सामना होणार आहे. गुजरात टायटन्सनं एकेकाळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं, पण तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यापासून संघाला तीच जादू पुन्हा निर्माण करता आलेली नाही. या वर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली नसली तरी, आज दोन्ही संघाची नजर सामना जिंकण्यावर असेल.

हेही वाचा : पंजाबचा दबदबा कायम; लखनऊचा धुव्वा उडवत मिळवला पाचवा विजय

अहमदाबादमध्ये रंगणार सामना :

आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला जाईल. गुजरातचा संघ कुठंही हरु शकतो, पण अहमदाबादमध्ये त्यांना हरवणं सोपं काम नाही. हे मैदान शुभमन गिलचं मानलं जातं, कारण तो इथं भरपूर धावा करतो. संघाची हंगामाची सुरुवात खराब झाली होती, पण सलग तीन सामने जिंकून त्यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे आणि गुणतालिकेत वेगानं वर सरकले आहेत.

मुंबईचा फॉर्म खराब :

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी हंगामातील पहिला सामना जिंकला असला तरी, त्यानंतर ते सलग चार सामने हरले आहेत. त्यांच्याकडे फक्त दोन गुण असून ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर संघर्ष करत आहेत. संघाची सर्वात मोठी ताकद असलेल्या जसप्रीत बुमराहनं एकही बळी घेतलेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आठ सामने खेळले गेले आहेत. यापैकी गुजरातनं पाच, तर मुंबईनं तीन सामने जिंकले आहेत. यावरुन असं दिसतं की, आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचं वर्चस्व असू शकते. मात्र, जर मुंबई इंडियन्सनं पुनरागमन केलं, तर ते अडचणीत येऊ शकतात.

सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल :

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यात चांगली लढत होते. इथं फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीची साथ मिळते. मात्र, असं म्हणता येईल की गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना जास्त फायदा होतो. चांगल्या उसळीमुळं चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. गुजरात आणि राजस्थान यांच्यात एक हाय-स्कोअरिंग सामना अपेक्षित आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत एकूण 44 आयपीएल सामने खेळले गेले असून, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानंही 22 सामने जिंकले आहेत.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • मुंबई इंडियन्स : रॉबिन मिंज, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेलटन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), राज बावा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, मिशेल सँटनर, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, जसप्रित बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, एएम गजनफर, रघु शर्मा, मयंक रावत, दानिश मालेवार, अथर्व अंकोलेकर, मोहम्मद सलाउद्दीन इजहार.
  • गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), अनुज रावत, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, शाहरुख खान, ग्लेन फिलिप्स, राशिद खान, मानव सुथार, निशांत सिंधु, राहुल तेवतिया, वॉशिंगटन सुंदर, गुरनूर बराड, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कगिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, जयंत यादव, ईशांत शर्मा, अशोक शर्मा, जेसन होल्डर, टॉम बँटन, पृथ्वी राज यारा, ल्यूक वुड, साई सुदर्शन, अरशद खान.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts