• Home
  • बिजनेस
  • एप्रिलच्या ‘या’ तारखांना राहणार बँका बंद; पाहा सुट्ट्यांची यादी
Top News

एप्रिलच्या ‘या’ तारखांना राहणार बँका बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

April Bank Holiday

Bank Holidays April 3rd Week: एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असून पुढील काही दिवसांत बँका बंद राहणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सुट्ट्यांची यादी.

एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असून महिना संपायला काहीच दिवस शिक्कल आहेत. मात्र, या उरलेल्या दिवसांमध्ये बँकांना अनेक सुट्ट्या येणार असल्याने ग्राहकांना नियोजन करणे गरजेचे आहे. बँकेशी संबंधित कामे असतील तर वेळेत पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा: नातं मजबूत ठेवायचं? मग भांडणात ‘या’ चुका करू नका!

या आठवड्यातील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक

20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत काही महत्त्वाच्या सुट्ट्या आहेत

20 एप्रिल (सोमवार)

बसवा जयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.

25 एप्रिल (शनिवार)

चौथा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील.

26 एप्रिल (रविवार):

साप्ताहिक सुट्टीमुळे सर्व बँका बंद राहतील.

सुट्टीचा परिणाम कुठे होणार?

20 एप्रिल रोजी देशातील सर्व बँका बंद राहणार नाहीत. केवळ काही राज्यांमध्येच सुट्टी लागू असेल. त्यामुळे इतर राज्यांतील ग्राहकांना बँक सेवा उपलब्ध राहतील.

ऑनलाइन सेवा सुरूच राहणार

बँका बंद असल्या तरी डिजिटल सेवा सामान्यपणे सुरू राहतील. एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल अ‍ॅप्सद्वारे व्यवहार करता येतील. त्यामुळे ग्राहकांना मोठी अडचण येणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts