The film Raja Shivaji : देशभरात १ मे रोजी प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटात जवळापास डझनभर दिग्गज कलाकरांनी भूमिका साकारली आहे. मात्र, यामध्ये सर्व दिग्गज कलाकरांना एक अभिनेत्री आपल्या कलेनी भारी पडल्याची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगताना दिसत आहे.
मराठी भाषेत चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी, हिंदी भाषेत मात्र तुलनेने थोडा मंद प्रतिसाद दिसून येत आहे. ‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर सलमान खानने शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चनने थोरले बंधू म्हणजे संभाजी राजेंची भूमिका साकारली असून संजय दत्तने अफझल खानची व्यक्तिरेखा रंगवली आहे.
मराठी भाषेत चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद
दरम्यान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या सर्व कलाकरांना पडद्यामागे पडलेल्या एका अभिनेत्रीच्या भूमिकेने जोरदार टक्कर दिलीय. त्यामुळे ही पडद्यामागे पडलेली अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने चर्चेत आलीय. मराठीत प्रचंड यश मिळवणाऱ्या या चित्रपटाला हिंदी प्रेक्षकांकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यामागे त्याचवेळी प्रदर्शित झालेल्या काही मोठ्या हॉलिवूड चित्रपटांचा प्रभाव आणि त्यांना मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे प्रमुख कारण मानले जातय
दिग्गजांची हजेरी एकटी अभिनेत्री भारी..
चित्रपटात अनेक मोठी नावं असली तरी एक अभिनेत्री आपल्या प्रभावी अभिनयामुळे सर्वांवर मात करताना दिसते. ही अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्या बालनने चित्रपटात ‘बडी बेगम’ ही भूमिका साकारली आहे. त्या आदिलशाही सल्तनतीतील एक प्रभावशाली महिला असून राज्यकारभारावर पडद्यामागून नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणून तिचे चित्रण करण्यात आले आहे.
विद्या बालनला फारसा स्क्रिन टाइम मिळाला नाही
विद्या बालनला चित्रपटात फारसा स्क्रीन टाइम मिळाला नसला तरी ती जेव्हा जेव्हा पडद्यावर दिसते, तेव्हा प्रेक्षकांवर ठसा उमटवते. तिचा लूक, संवादफेक आणि अभिनय इतका प्रभावी आहे की, प्रेक्षकांचे पूर्ण लक्ष तिच्या भूमिकेकडे वेधले जाते. अफझल खानला शिवाजी महाराजांकडे पाठवण्याचा निर्णयही तिच्या सूचनेवर आधारित असल्याचे दाखवण्यात आले आहे.












