Lord Shiva Temple Demolished: तेलंगणा राज्यातील वारंगळ येथे अत्यंत क्लेशदायक घटना घडली आहे. माहितीनुसार खानापूर येथे शिलाहार काळातील ८०० वर्ष जुने व स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर मंदीर पाडण्यात आले आहे . या घटनेमुळे नागरिक अत्यंत संतप्त असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. वरंगळ येथील खानापूर अशोक नगर भागातील एकूण ८०० वर्ष जुने मंदिर पडले आहे. हे मंदिर शिलाहार काळातील असून स्थापत्य कलेचा उत्तम नमुना मानले जात होते. मात्र, एका सरकारी एकात्मिक शाळेच्या (Integrated School) बांधकामासाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली हे मंदिर पाडल्या गेले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि इतिहासकारांनी या प्रकरणी प्रशासनाकडून उत्तर मागितले आहे.
पुरातत्व विभागाद्वारे अधिकृत नोंद
वारंगल जिल्ह्यातील खानापूर मंडळातील अशोक नगर येथे हे प्राचीन मंदिर होते. १३ व्या शतकातील काकतीय राजा ‘गणपती देव’ यांच्या कारकिर्दीतील हा ऐतिहासिक वारसा होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी १२३१ इसवी मधील सात ओळींचा दुर्मिळ तेलुगू शिलालेख होता, ज्यामध्ये राजाचा उल्लेख ‘महाराजा’ आणि ‘राजाधिराजुलु’ असा करण्यात आला होता. १९६५ मध्येच वारसा विभागाने या मंदिराची अधिकृत नोंद केली होती.
कार्यवाहीची मागणी
पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे मंदिर पाडल्याबद्दल तेलंगणा वारसा कायदा (कलम ३०) अंतर्गत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यामुळे या विभागात तणावाचे वातावरण दिसत असून सरकारने मंदिराची पुनर्बांधणी करून देण्याचे आश्वासन दिले आहे. इतिहासकार, पारंपारिक वास्तुविशारद आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर पुन्हा उभारले जाणार असून, या जागेला आता औपचारिकरीत्या संरक्षित घोषित करण्यात येणार आहे. वारंगलच्या जिल्हाधिकारी डॉ. सत्य शारदा आणि आमदार डोंथी माधव रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. झालेल्या चुकीची दखल घेतली आहे.
धरोहरांचा ह्रास?
पण या वास्तुकलेच्या उत्तम नमुना असलेल्या या मंदिराला पडून काय मिळाले? याद्वारे लोकांच्या ज्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्याचे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहेत. कारण हे फक्त मंदिर नसून भारताच्या स्थापत्य संस्कृतीतील एक महत्वाचा घातक होते. परिवर्तनाच्या नावाखाली होणाऱ्या सुंदर धरोहरांच्या ह्रासाकडे आपण लक्ष दिले पाहिजे.







