Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • दहावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! कसलीही परीक्षा न देता मिळणार रेल्वेत नोकरी, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Top News

दहावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! कसलीही परीक्षा न देता मिळणार रेल्वेत नोकरी, जाणून घ्या भरती प्रक्रिया

SECR Recruitment 2026 | दहावी पास तरूणांसाठी एक मोठी सवर्णसंधी आहे. जे दहावी पास विद्यार्थी आहेत या तरूणांना रेल्वेत नोकरीची संधी निर्माण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कसलीही परीक्षा न देता या तरूणांना रेल्वेत नोकरी मिळणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) वर्ष 2026-27 साठी ट्रेड अप्रेंटिसच्या 1644 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा – “जर युरेनियम साठ्यांच्या जवळ गेला तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, दिला गंभीर इशारा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रेल्वेमध्ये फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, मेकॅनिक यासाह अनेक पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. तर या पदांसाठी उमेदवारांना कोणतीही मुलाखत किंवा कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये. उमेदवरांची निवड थेट गुणवत्तेच्या आधारवर केली जाणार आहे. तसेच ही भरती रायपूर विभागासाठी आणि वॅगन रिपेअर शॉपसाठी करण्यात येणार आहे.

रेल्वे भरतीच्या या पदासांठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उर्तीण केलेली असावी. तसेच उमेदवाराचे किमान 50 % गुण असणे अनिवार्य आहे. सोबतच उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्ष असावे आणि संबंधित ट्रेडमधील SCVT किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाहीये. उमेदवारांची गुणवत्ता ही त्यांच्या इयत्ता दहावी आणि आयटीआयच्या गुणांवर आधारित असेल, ज्यामध्ये प्रत्येकाला 50 टक्के असणे अनिवार्य आहे.  त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 मे 2026 पासून सुरू झाली आहे. तर उमेदवार 4 जून 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर जा. तिथे स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन आयडी तयार करा. त्यानंतर ‘Establishment Search’ वर जाऊन SECR रायपूर शोधा. तुमच्या संबंधित ट्रेडसमोर दिलेल्या ‘Apply’ बटणावर क्लिक करा. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा. नंतर दहावीची गुणपत्रिका, आयटीआय प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो आणि सही अपलोड करा. सर्व तपशील तपासून फॉर्म सादर करा आणि अर्जाच्या फॉर्मची प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts