Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! CRPF मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पात्रता, जागा अन् अर्जाची तारीख
एजुकेशन- जॉब

देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! CRPF मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पात्रता, जागा अन् अर्जाची तारीख

CRPF
66

CRPF Constable Recruitment | तरूणाईचं आता देशसेवेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) 2026 च्या कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समन आणि पायनियर) भरती मोहिमेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 9,000 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे आता तरूणाईसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे.

हेही वाचा – दहावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! कसलीही परीक्षा न देता मिळणार रेल्वेत नोकरी, जाणून घ्या भरती प्रक्रिया

या भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाहीये. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवार अर्ज भरू आणि सादर करू शकतील. तर या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 9,175 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 9,096 आणि महिला उमेदवारांसाठी 79 पदांचा समावेश आहे. lms; या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी. काही पदांसाठी आयटीआय प्रमाणपत्र आणि संबंधित अनुभवासह तांत्रिक पात्रता देखील आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांना अधिकृत वेबसाइवर जावं लागेल. यानंतर उमेदवारांना होमपेजवरील LBO रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर उमेदवारांना सर्वप्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल. मग उमेदवारांनी आपला अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने तो सादर करावा.
अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts