• Home
  • मनोरंजन
  • प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली; नेमकं घडलं काय?
Top News

प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली; नेमकं घडलं काय?

dileep raj

Dileep Raj Passes Away | सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते आणि निर्माते दिलीप राज (Actor Dileep Raj) यांचं निधन झालं आहे. दिलीप राज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – मौनी रॉयच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? पतीला केलं अनफॉलो, घटस्फोट होणार?

दिलीप राज यांच्या निधनानं सिनेसृष्टीत खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप राज यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाच्या बातमीने कन्नड चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून, चाहते आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप राज यांच्या कारकि‍र्दीबाबत सांगायचं झालं तर ते कन्नड दूरदर्शनवरील एक सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी ‘रंगोली’, ‘हिटलर कल्याणा’, ‘कंबडा माने’, ‘जननी’, ‘अर्ध सत्या’, ‘कुमकुम भाग्य’, ‘मंगल्या’ आणि ‘प्रीतीघाटी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्यांनी अनेक रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केले होते. विशेष म्हणजे ‘हिटलर कल्याणा’मधील त्यांच्या मुख्य भूमिकेने दूरदर्शन प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली होती.

मालिकांसोहत दिलीप राज हे चित्रपट, दूरदर्शन, रंगभूमी आणि डबिंगमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जात होते. त्यांनी ‘मिलन’, ‘यू-टर्न’, ‘ऑर्केस्ट्रा म्हैसूर’, ‘बॉयफ्रेंड’ आणि ‘लव्ह मॉकटेइल 3’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts