Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • सोनं महागलं तर चांदी झाली स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी तपासा आजचे नवे दर
Top News

सोनं महागलं तर चांदी झाली स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी तपासा आजचे नवे दर

Gold-Silver Prices | मागील काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरांमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. कधी सोन्याच्या किंमती वाढत आहेत तर कधी कमी होताना दिसत आहेत. तर कधी चांदीच्या किंमतींमध्येही चढ-उतार होताना दिसत आहेत. आताही सोनं महागलं, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. मात्र, दुसरीकडे चांदी स्वस्त झाली आहे, त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा –  “राजकारणाचा नियम आहे 1 रूपयाचं काम करायंच अन् 10 रूपयांची…”, नितीन गडकरींच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

सोन्या-चांदीचे आजचे दर काय?

आज (19 मे) सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी सुमारे 9.51 वाजता 5 जून डिलिव्हरीचे सोने ₹93 रुपयांनी वाढून ₹1,58,996 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर 3 जुलै डिलिव्हरीची चांदी ₹1,485 रुपयांनी घसरून ₹2,75,266 प्रति किलोवर पोहोचली.

मंगळवारी सोन्याच्या दरात थोडे चढ-उतार पाहायला मिळाले. 5 जून डिलिव्हरीचे सोने सोमवारच्या ₹1,59,008 प्रति 10 ग्रॅम दराच्या तुलनेत त्याच दराजवळ उघडले. दिवसभरात सोन्याचा भाव ₹1,59,437 पर्यंत वाढला, तर किमान ₹1,58,601 पर्यंत खाली आला. दरम्यान, 3 जुलै डिलिव्हरीच्या चांदीच्या दरात किंचित घसरण झाली. चांदी ₹2,76,271 प्रति किलो दराने खुली झाली. दिवसभरात चांदीचा उच्चांक ₹2,76,666 प्रति किलो, तर नीचांक ₹2,74,606 प्रति किलो इतका नोंदवला गेला आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वेगवेगळे बदल दिसून आले. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 1000 रुपयांच्या वाढीसह 2,76,000 रुपये प्रति 1 किलोवर बंद झाला. चांदी वगळता दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही आणि तो गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या दराप्रमाणे 1,62,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिर राहिला.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts