UGC NET 2026 Correction Window Open: युजीसी नेटची तयारी करणाऱ्यांना एक महत्वाची बातमी आहे. जून २०२६ परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर उमेदवारांना आता आपल्या फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतात.
युजीसी नेट जून २०२६ परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरू करण्यात आली आहे. अर्जात काही चुका झाल्या असतील तर उमेदवार आता २८ मे २०२६ रात्री ११ वाजून ३० मिनिटांपर्यंत आपल्या फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतात.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत युजीसी नेट (UGC NET) परीक्षा २२ जून ते ३० जून २०२६ दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत पूर्ण झाली होती.
हेही वाचा: अजित पवार अपघात प्रकरण तापलं; Rohit Pawar यांचा CID ला इशारा, उद्या कार्यालयात जाणार
आता उमेदवारांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, अंतिम मुदतीनंतर कोणतीही सुधारणा करता येणार नाही. त्यानंतर चुकीची माहिती असल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
अर्जात बदल कसा करावा?
अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा
होमपेजवरील रजिस्ट्रेशन/करेक्शन लिंक उघडा
“Already Registered Candidate” पर्याय निवडा
लॉगिनसाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका
फॉर्म स्क्रीनवर दिसेल
आवश्यक बदल करा
सुधारित फॉर्म सबमिट करून सेव्ह करा
परीक्षाबाबत अधिक माहिती
यूजीसी नेट 2026 परीक्षा एकूण 87 विषयांसाठी घेतली जाणार आहे. यामध्ये यंदा दोन नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
सांख्यिकी (Statistics) आणि वनीकरण (Forestry). याआधी ही परीक्षा 85 विषयांसाठी घेतली जात होती.
सिटी स्लिप 10 जून 2026 रोजी आणि अॅडमिट कार्ड 15 जून 2026 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
परीक्षा पद्धत काय आहे?
परीक्षा दोन पेपरमध्ये (ऑब्जेक्टिव्ह प्रकार प्रश्न) असेल
दोन्ही पेपर एकाच सत्रात घेतले जातील
एकूण कालावधी: 3 तास
पेपर-1: 50 प्रश्न (100 गुण)
पेपर-2: 100 प्रश्न (200 गुण)
एकूण गुण: 300
प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण
निगेटिव्ह मार्किंग नाही
UGC NET परीक्षा का घेतली जाते?
UGC NET परीक्षा दरवर्षी दोन वेळा घेतली जाते. यामध्ये उमेदवारांना असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि पीएचडी प्रवेशासाठी संधी मिळते.






