• Home
  • महाराष्ट्र
  • ‘तुला मी फ्री करतो टेन्शन घेऊ नकोस…” म्हणत पतीचा अंत; ६ मिनिट २४ सेकंदाचा व्हिडिओ ठरला अखेरचा संदेश
Top News

‘तुला मी फ्री करतो टेन्शन घेऊ नकोस…” म्हणत पतीचा अंत; ६ मिनिट २४ सेकंदाचा व्हिडिओ ठरला अखेरचा संदेश

Solapur Crime

Solapur Suicide Case: सोलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती समोर आली आहे.

सोलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलवर सात मिनिटांचा व्हिडिओ तयार केला होता, ज्यामुळे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल यांचे पत्नीशी काही कारणावरून मतभेद झाले होते. या वादानंतर मानसिक तणाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडलीस येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: महागाईचा निषेध अनोख्या पद्धतीने! नवी मुंबईत रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन

६ मिनिट २४ सेकंदाचा व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाले?

आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नीला उद्देशून काही भावनिक विधानं केल्याची माहिती समोर आली. तुला मी फ्री करतो टेन्शन घेऊ नकोस… तुला आझाद करतो.. तुला आता विचारणार कोणी नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या आयुष्यातील वेदना व्यक्त करत त्यांनी आपले जीवन संपवले. या व्हिडिओमधील आशयाची सध्या पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.

घटना लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तपासणीअंती त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts