Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • केंद्राचा मोठा निर्णय! इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर उत्पादन शुल्कातून सूट; काय आहे नवा फॉर्म्युला?
Top News

केंद्राचा मोठा निर्णय! इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर उत्पादन शुल्कातून सूट; काय आहे नवा फॉर्म्युला?

Ethanol Blended Petrol India: देशातील इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने इंथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, २२ टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यत इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्कात सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अधिक इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनाच्या वापरला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारच्या नव्या धोरणानुसार, E22, E25, E27 आणि E30 या श्रेणीतील पेट्रोल मिश्रणांना उत्पादन शुल्कातून सूट मिळणार आहे. सध्या देशात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) वापराचा प्रचार होत असताना, त्यापेक्षा जास्त इथेनॉल असलेल्या इंधनालाही प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा: प्रसाद वेदपाठकांच्या पोस्टवर वादग्रस्त रिप्लाय; “मुंबईवर आमचंच वर्चस्व” दाव्याने खळबळ

भारत हा जगातील प्रमुख कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे परदेशातून होणाऱ्या तेल आयतीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यायी इंधन स्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. इथेनॉल मिश्रण वाढविण्याचा निर्णय हा त्याच धोरणाचा भाग असल्याचे मानले जाते.

दरम्यान, ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ ((BIS) ने E20 पेक्षा जास्त इथेनॉल असलेल्या पेट्रोलसाठी गुणवत्ता निकष निश्चित केल्यानंतर सरकारने उत्पादन शुल्कातील बदलाची अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे इथेनॉल मिश्रित इंधनाच्या उत्पादन आणि वापराला गती मिळू शकते, तसेच दीर्घकालीन दृष्टीने इंधन क्षेत्रातील स्वावलंबनाला हातभार लागू शकतो.

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने आणि पर्यावरणपूरक इंधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts