U.S. attack on Iran : सध्या जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या बातमीमुळे भारतात कल्ला सुरू झाला आहे. नुकतास अमेरिकेने इराणवर हेलिकॉप्टर हल्ला केला. इराणने देखील अमेरिकेवर प्रतिहल्ला करत त्यांच्या लष्काराचे हेलिकॉप्टर पाडले. मात्र, त्यानंतर इराणने संपूर्ण जगाची झोप उडवणारा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकी लष्कराचे पहिल्यांदा इराणने आमचे हेलिकॉप्टर पाडल्याचे आरोप करत हा हल्ला केला. मात्र, हा आरोप धुडकावून लावत अमेरिकाच आपल्यावर हल्ला करत असल्याचे इराणने म्हटले आहे. याच दरम्यान जगाची झोप उडवणारा निर्णय इराणने घेतलाय. इराणने थेट होर्मुज खाडी बंद केली. अमेरिकेच्या तटबंदीनंतर इराण इतर देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देत होता. होर्मुज खाडीतून कमी प्रमाणात का होईना मात्र जहाज ये-जा करत होती.
होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजाला उडवण्याची धमकी
दरम्यान, भारतात याच मार्गे कच्चे तेलाची आयात होत होती. मात्र, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी होर्मुज खाडी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील काळात भारतात इंधन टंचाई मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगातील सर्वात महत्वाच्या जलमार्गापैकी एक असलेला होर्मुज मार्ग सध्याच्या घडीला पूर्णपणे बंद आहे. ज्यामुळे भारतावर पुन्हा एकदा इंधन संकट उभा राहणार आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजाला उडवले जाईल, अशी थेट धमकी इराणने दिली आहे.
अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्याची धमकी
इराणने होर्मुज खाडी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी या आदेशात स्पष्ट म्हटले की, तेल जहाज किंवा कोणत्याही जहाजाला या मार्गे जाऊ दिले जाणार नाही. जर कोणी जहाज होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थेट उडवले जाईल. आता होर्मुज खाडी प्रत्येक जहाजाकरिता बंद करण्यात आली. बंदार, सिरिक, केश्म आणि इराणच्या अजून बऱ्याच शहरांमध्ये अमेरिकेने हल्ला केला. आज पुन्हा इराणवर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिलीये.
होर्मुज खाडी पार करणाऱ्या दोन जहाजांना इराणने उडवले
तर दुसरीकडे इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान यांनी म्हटले की, इराण कोणत्याही धमकी या दबावाकरिता खंबीरपणे उभा आहे. दोन जहाजांना होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर थेट निशाणा साधत उडवण्यात आले. मात्र, हे जहाज नक्की कोणत्या देशाची होती, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये. भारतात 40 टक्के तेल आणि 50 टक्के एलपीजी गॅस होर्मुज खाडीच्या मार्गातूनच येतो. ज्यामुळे आता होर्मुज खाडी पूर्णपणे बंद असल्याने भारतावर संकट आहे.












