US military attack Indian ships : ओमान खाडीजवळ अमेरिकेची दादागिरी इतकी जास्त वाढली आहे की, दिसेल त्या जहाजावर अमेरिकेच्या लष्कराकडून हल्ला केला जात आहे. गेल्या ३ दिवसांत ३ जहाजांवर अमेरिकेकडून मोठे हल्ले करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे यापुर्वीच २४ भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर हल्ला करण्यात आला होता. मात्र, भारताकडून ठोक भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर आता थेट भारतीय इंधनवाहू जहाजाला टार्गेट करत अमेरिकेने मिसाईल हल्ला केला. त्यामुळे सध्याच्या परिस्थित ओमान समुद्रामध्ये आगडोंब उसळताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय इंधनवाहू एमटी जलवीर नावाची जहाज ओमानच्या खाडीतून मार्ग काढत भारताच्या दिशेने येत होती. मात्र, त्याच वेळी शिनास बंदर जवळ हा हल्ला करण्यात आला. या जहाजावरील हल्ल्यानंतर धक्कादायक फोटो पुढे आली आहेत. त्या फोटोमध्ये जहाजाला मोठी आग लागल्याचे दिसत आहे.
हल्ल्याची माहिती ओमानच्या भारतीय दूतावासाने दिली
या घटनेनंतर भारतीय अधिकारी ओमान खाडीजवळच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर सरकारकडून स्थानिक प्रशासनासोबत संपर्क साधण्यात आला. नक्की हा हल्ला का करण्यात आला आणि तिथे नक्की कशी स्थिती आहे, याबाबत फार काही माहिती मिळू शकत नाहीये. या हल्ल्याची माहिती ओमानच्या भारतीय दूतावासाने दिली.
We have learnt of an incident involving a vessel off Shinas port of Oman, earlier today . We are closely monitoring the situation and coordinating with the local authorities for further details.
— India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) June 11, 2026
२४ भारतीय नागरीक असलेल्या जहाजावर हल्ला
या प्रकरणाची माहिती गोळा केली जात आहे. ओमानच्या समुद्राजवळ एका जहाजावर हल्ला करण्यात आला. त्यात 24 भारतीय नागरिक होते, ज्या जहाजावर हल्ला बुधवारी करण्यात आला. त्याचे नाव सेटेबेलो होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा थेट भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश मॅरीटाईम सिक्योरिटी ग्रुप एम्ब्रे यांच्या रिपोर्टनुसार, इराणी बंदरांना तटबंदी करण्याकरिता अमेरिकेकडून ही पाऊले उचलली जात आहेत.
ओमानच्या समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेचे हल्ले वाढले आहेत. जहाजांना टार्गेट करून पेटवले जात आहे. भारताने हा घटनेचा निषेध केला असून भारताकडून या हल्ल्याविरोधात मोठी पाऊले उचलली जात आहेत. मात्र, मध्य पूर्वेत तणाव कमी व्हायचा सोडून शिगेला पोहोचला आहे. जर स्थिती अशीच राहिली तर जग वेगळ्या मोठ्या संकटात सापडू शकते. हे युद्ध थांबवण्याकरिता मोठा दबाव अमेरिकेवर आहे.












