Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • भारताला धक्का! तिरंगा झेंडा असलेल्या भारतीय जहाजावर गोळीबार
Top News

भारताला धक्का! तिरंगा झेंडा असलेल्या भारतीय जहाजावर गोळीबार

Attack on an Indian Ship

Attack on an Indian Ship : इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी दोन आठवड्यांकरिता जाहीर करण्यात आली. मात्र, स्थिती अजूनही गंभीर होत आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आलाय. भारतीय जहाजावर होर्मुज खाडीत गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. आता भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार नक्की का करण्यात आलाय? याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, इराणचा हा निर्णय भारताला संकटात ढकलणारा ठरणार आहे.

हेही वाचा – होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी गनबोट्सकडून टँकरवर गोळीबार; तणाव वाढला

भारतीय जहाजाला थेट टार्गेट बनवलं

भारताने या युद्धात भूमिका कायमच शांततेची ठेवली. भारताचे इराणसोबत चांगले संबंध आहेत. ज्यावेळी तणाव प्रचंड होता, त्यावेळीही भारताची जहाजं होर्मुज खाडीतून सोडली जात होती. मात्र, काल भारताला अत्यंत मोठा धक्का देत थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जहाजाला त्यांनी थेट टार्गेट बनवलं. यानंतर भारतानेही कडक भूमिका घेतली. याचं अत्यंत मोठं कारण पुढे आलंय. भारतीय गुप्तचर सूत्रांच्या रिपोर्टनुसार, भारतीय जहाजांवर इशारा म्हणून इराणकडून गोळीबार करण्यात आलाय. हा गोळीबार इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागणार आहे.

आयआरजीसी आणि परराष्ट्र मंत्रालयात दुफळी

इराणमधील सत्तेचा समतोल बिघडल्याचं बघायला मिळत आहे. सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. इराणमधील काही गोष्टी अस्थिर झाल्यात. इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना आयआरजीसी आणि परराष्ट्र मंत्रालय दोघांमध्ये खटके उडत आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यांच्यात मोठे मतभेद निर्माण झालेत.

होर्मुज खाडी खुली करण्याला आयआरजीसीचा विरोध

होर्मुज खाडी खुली करण्यालाही आयआरजीसीचा विरोध आहे. होर्मुज खाडी खुली केल्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेला उघडपणे त्यांनी भारतीय जहाजावर हल्ला करून विरोध केला आणि मोठं आव्हान दिलं. याच कारणामुळे होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर इशारा पर गोळीबार करण्यात आला. इराणमध्ये युद्धबंदीच्या मुद्दात दोन गट तयार झाल्याचं बघायला मिळत आहे. भारतही जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिकेत दिसत आहे.

गोळीबारानंतर भारताकडून कडक भूमिका

होर्मुज खाडीत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतानेही यानंतर कडक भूमिका घेतली. भारत युद्धात कोणाच्याही बाजूने नाहीये. मात्र, असं असतानाही भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला. इराणच्या लष्कराने शनिवारी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका भारतीय जहाजाला थांबवलं आणि हेच नाही तर तात्काळ पुन्हा बंदरावर जाण्याचे आदेश दिले. एक ऑडिओ रिकॉर्डिंग यादरम्यानच्या संवादाचे रेकॉर्ड झाले.

भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार

इराणच्या अधिकाऱ्याने भारतीय जहाजाच्या कॅप्टनला होर्मुज खाडी अजूनही बंद असल्याचं सांगितलं. तुम्ही लवकरात लवकर बंदरावर परत जा. गो टू बँक तात्काळ जा. यावर भारतीय जहाजाच्या कॅप्टनने म्हटलं की, ठीक आहे. त्यानंतर काही वेळातच जहाजाने आपला मार्ग बदलला. या संवादापूर्वी इराणने भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार केला. हे जहाज इराणी तेल घेऊन भारतात जात होतं. या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताच्या सरकारने मोठी चिंता व्यक्त केली. हेच नाही तर इराणी राजदूतसोबत भारताने चर्चा केली. भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार करण्यात आल्याने भारतात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts