Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • अक्षय तृतीया! सोन्या-चांदी दरात चढ-उतार खरेदीची हीच योग्य वेळ?
Top News

अक्षय तृतीया! सोन्या-चांदी दरात चढ-उतार खरेदीची हीच योग्य वेळ?

Gold and Silver Rates on Akshaya Tritiya

Gold and Silver Rates on Akshaya Tritiya : आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस, ज्या दिवशी केलेली गुंतवणूक अक्षय राहते असं मानलं जातं. पण यावर्षी सोनं खरेदी करायला जाणाऱ्यांच्या मनात एकच धाकधूक होती… ती म्हणजे सोन्याचे वाढते भाव! गेल्या काही महिन्यांत सोन्याने जो रॉकेटचा वेग पकडला होता, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. पण तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, ऐतिहासिक उच्चांकापेक्षा सोनं अजूनही हजारो रुपयांनी स्वस्त मिळतंय. नक्की काय आहे आजचं गणित? जाणून घ्या…

गेल्या पाच दिवसांत बाजारपेठेत तेजी पाहायला मिळाली, तरीही ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत सोने-चांदी आजही स्वस्त दरात उपलब्ध आहेत.गेल्या पाच दिवसांत बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली.

हेही वाचा – अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव काय? पाहा ताजे दर

सोनं 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त

सोने-चांदीच्या किमतींमध्ये गेल्या आठवड्यात मोठा बदल दिसून आला. पाच दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात तेजी नोंदवली गेली. मात्र, या पाच दिवसांच्या वाढीनंतरही एमसीएक्सवर सोने आपल्या उच्चांकापासून 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त आहे. चांदीबाबत बोलायचे झाले तर, हा मौल्यवान धातूही आपल्या उच्चांकापासून अजूनही 1.81 लाख रुपये इतका स्वस्त झाला आहे. गेल्या पाच दिवसांत 1किलो चांदीच्या किमतीत 14 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली होती.

आठवड्याभरातील वाढीनंतरही चांदीच्या किमतीत मोठी घसरण

तुम्हाला वाटत असेल की गेल्या आठवड्यात दर वाढले आहेत, तर मग स्वस्त कसं? मित्रांनो, खरी गंमत इथेच आहे. सोन्याच्या आजच्या दराची तुलना जेव्हा आपण त्याच्या ऑल टाइम हाय दराशी करतो, तेव्हा आपल्याला खरा फरक कळतो. चांदीचे दर गेल्या आठवड्यातील पाच दिवसांत 14 हजार 805 रुपयांनी वाढले. 10 एप्रिलला 1 किलो चांदीचा दर 2 लाख 43 हजार 274 रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी 2 लाख 58 हजार 079 रुपये रुपये प्रति किलोवर झाला. उच्चांकाशी तुलना केल्यास, आठवड्याभरातील वाढीनंतरही चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसत आहे.

पिवळ्या धातूचा एमसीएक्सवरील सर्वकालीन उच्चांक

सोन्याच्या दर चांदीप्रमाणे गेल्या आठवड्यात चमकला. 10 एप्रिलला 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर एमसीएक्सवर 1 लाख 52 हजार 652 रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी वाढून 1 लाख 54हजार 605रुपये प्रति 10ग्रॅमवर बंद झाला. याचा अर्थ गेल्या आठवड्यात सोन 1 लाख 953 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग झालं. चांदीप्रमाणेच सोन्याचा दरही जानेवारी महिन्यात वेगाने वाढत प्रथमच 2लाख रुपये प्रति 10ग्रॅमच्या पुढे गेला होता. या मौल्यवान पिवळ्या धातूचा एमसीएक्सवरील सर्वकालीन उच्चांक होता. सध्याच्या दराची तुलना केल्यास, सोने अजूनही 48 हजार 379 रुपये स्वस्त मिळत आहे.

सोनं खरेदी करण्याची ग्राहकांसाठी गोल्डन संधी

आता प्रश्न उरतो की, अक्षय तृतीयेच्या दिवशी ही खरेदी फायद्याची ठरेल का? तर तज्ज्ञांच्या मते मध्यमवर्गीयांसाठी दिलासा असणार आहे. २ लाखांचे सोने 1.54 लाखांवर येणे ही मोठी घसरण आहे. लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. जरी गेल्या 5 दिवसात दर थोडे वाढले असले, तरी बाजारातील एकूण कल पाहता हे दर पुन्हा 2 लाखांच्या दिशेने जाऊ शकतात. त्यामुळे आता खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. चांदीमध्ये आलेली 14 हजारांची वाढ ही बाजारातील तेजी दर्शवते, त्यामुळे चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांनी त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे.

भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीया हा सण यंदा रविवार, 19 एप्रिलला साजरा होत आहे. ‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे या दिवशी केलेले शुभ कार्य, दान आणि गुंतवणूक ही अनंत पटीने फळ देणारी ठरते, अशी जनमानसात प्रगाढ श्रद्धा आहे. यंदा सोने खरेदीसाठी पहाटेपर्यंत प्रदीर्घ मुहूर्त लाभल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.
सोन्याचे दर गगनाला भिडलेले असले तरी, उच्चांकाच्या तुलनेत आज तुम्हाला सोनं 48 हजार रुपयांनी स्वस्त मिळतंय. त्यामुळे या अक्षय तृतीयेला तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. फक्त खरेदी करताना हॉलमार्किंग तपासायला विसरू नका.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts