Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • दिल्लीनंतर आता पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नीट आणि सीबीएसई घोटाळ्यांवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Pune

दिल्लीनंतर आता पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नीट आणि सीबीएसई घोटाळ्यांवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Cockroach Janata Party protest

Pune Cockroach Janata Party Protest: पुण्यात कॉकरोच जनता पार्टीकडून आज ११ जून रोजी मोठे आंदोलन करण्यात आले आहे. यात नीट पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांतील कथित घोटाळ्यांवरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी दिल्लीतही असेच आंदोलन झाले होते.

पुण्यात आज ११ जून रोजी, कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने पुणे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले असून, या आंदोलनात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नीट पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांडून करण्यात आली.

हेही वाचा : पक्षहिताला प्राधान्य, कार्यकर्त्यांना संधी; गरज पडल्यास अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार

आंदोलनादरम्यान शहरातील विविध भागांतून नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तरुण विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापकी अभिजित दीपके यांची उपस्थिती होती. तसेच समाजसेवक सोनम वांगचुक यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. विविध सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

आंदोलना दरम्यान काय म्हणाले दीपके

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांमधील गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

यापूर्वीही अभिजीत दीपके यांनी दिल्लीमध्ये अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. त्यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही लढाई सुरूच राहील.

दरम्यान, येत्या 20 जून रोजी नवी दिल्लीत पुन्हा मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील काळात राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात अधिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts