Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ठाण्यात परप्रांतीय चालकाकडून वृद्धाला मारहाण; राज ठाकरेंनी फोनवरून केली विचारपूस
ताज्या बातम्या

ठाण्यात परप्रांतीय चालकाकडून वृद्धाला मारहाण; राज ठाकरेंनी फोनवरून केली विचारपूस

thane

Assault Incident Outside Jupiter Hospital Sparks Public Outrage: ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एका वृद्ध व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जखमी वृद्धाशी फोनवरून संवाद साधत त्यांची विचारपूस केली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

ठाण्यातील एका रुग्णालयाबाहेर वृद्ध व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून आरोपीविरोधीत कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा : शिक्षणाचा खर्च आता सोपा! M.Tech विद्यार्थ्यांसाठी सरकारने आणली ‘ही’ खास शिष्यवृत्ती योजना; जाणून घ्या A टू Z माहिती

किरकोळ कारणावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एका परप्रांतीय वाहनचालक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद पुढे वाढत गेल्यानंतर वाचनचालकाने वृद्ध व्यक्तीला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांनी जखमी वृद्ध व्यक्तीशी फोनवर संवाद साधला

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जखमी वृद्ध व्यक्तीशी फोनवर संवाद साधल्याचे माहिती समोर आली आहे. मनसे नेते Avinash Jadhav यांच्या माध्यमातून हा संवाद घडवून आणण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. घटनेचा संपूर्ण तपशील आणि नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts