today gold silver price Maharashtra : देशांतर्गत सराफा बाजारात मंगळवारपासून सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार घसरण दिसून आली आहे. दिवसभरातील चढ-उतारानंतर सायंकाळी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय घट झाली. कच्च्या तेलाच्या भावातही सुमारे ३.८० टक्क्यांची घसरण झाल्याचा परिणाम बाजारावर दिसला.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्ट डिलिव्हरी सोन्याच्या भावात एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदवली गेली. रात्री उशिरा सोन्याचा भाव १,३८० रुपयांनी घसरून १,५३,४०४ रुपये प्रति १०० ग्रॅमवर व्यवहार करत होता. याच कालावधीत सोन्याचा उच्चांक १,५५,४५१ रुपये तर नीचांक १,५२,९२० रुपये राहिला.
चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली. ३.४० टक्क्यांनी घसरलेल्या चांदीचा भाव ६,५९७ रुपयांनी कमी होऊन २,३९,७९२ रुपये प्रति किलोग्रामवर आला. यावेळी चांदीचा उच्चांक २,४८,९२१ रुपये आणि नीचांक २,३७,२५० रुपये होता. आदल्या दिवशी चांदी २,४६,३८९ रुपयांवर बंद झाली होती.
IBJA नुसार आजचा (१० जून) दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५२,५१९ रुपये होता. मात्र दुपारी आणि संध्याकाळी आणखी घसरण झाल्याने हा दर १,४७,१४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई – १,४७,१४
पुणे – १,४७,१४६
नागपूर – १,४७,१४६
कोल्हापूर – १,४७,१४६
जळगाव – १,४७,१४६
सांगली – १,४७,१४६
बारामती – १,४७,१४६











