• Home
  • राजकारण
  • अभिजित दिपके पंतप्रधान मोदींना अमेरिकेत भेटला? राऊतांच्या दाव्याने खळबळ
ताज्या बातम्या

अभिजित दिपके पंतप्रधान मोदींना अमेरिकेत भेटला? राऊतांच्या दाव्याने खळबळ

Abhijit Dipke

Abhijit Dipke: अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दीपके यांची भेट झाल्याचा दावा आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. नेमकं या प्रकरणामागे काय आहे, याबाबत जाणून घेऊया.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यात
अमेरिकेत बैठक झाल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या भेटीचे काही फोटो आपल्याकडे पाठवण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: ITR भरण्याची मुदत चुकली तर किती दंड? जाणून घ्या लेट फी आणि महत्त्वाच्या तारखा

अमेरिकेत भेट झाल्याचा दावा

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदी आणि अभिजित दीपके यांची अमेरिकेत बैठक झाल्याचे फोटो काही व्यक्तींनी त्यांना पाठवले आहेत. या भेटीनंतर दीपके भारतात परतले, असा दावाही त्यांनी केला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवा वाद

अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून परतल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर पुण्यातही त्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा नवा दावा समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राऊतांची भूमिका

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, ते कोणतेही आरोप करत नाहीत, तर मिळालेली माहिती माध्यमांसमोर मांडत आहेत. सरकारला तरुणांचे प्रश्न गांभीर्याने ऐकावे लागतील, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींबाबत टीका

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवडणूक प्रक्रियेवरही टीका केली. त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि संस्थांचा वापर करून सत्ता मिळवल्याचा आरोप करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, या आरोपांबाबतही कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts