CUET UG 2026 चा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला आहे. उमेदवारांनी स्कोअरकार्ड कुठे आणि कसा चेक करायचा चला तर जाणून घेऊयात.
CUET UG 2026 Result: CUET UG 2026 परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) अंडरग्रॅज्युएट म्हणजेच CUET UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी आपले गुणपत्रक अधिकृत वेबसाईट https://cuet.nta.nic.in/ वर जाणून पाहू शकतात.
NTA ने सोमवारी संध्याकाळी CUET UG 2026 ची अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://cuet.nta.nic.in/ वर लॉग इन करून आपला निकाल तपासू शकतात. परीक्षेतील आधारावर, ४६ पेक्षा जास्त विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. निकाल जाहीर झाल्यानंतर, संबंधित विद्यापीठांकडून प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. (Tajya Batmya Marathi)
हेही वाचा: आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्यात बाचाबाची; विधानसभेत नेमकं काय घडलं?
परीक्षा कधी घेण्यात आले?
CUET UG 2026परीक्षा ही ११ मे ३१ मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. मात्र बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर २८ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ती ६ आणि ७ जून रोजी घेण्यात आली. ही परीक्षा भारतासह परदेशातील ३२१ शहरांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ३७ विषयांचा समावेश होता. त्यामध्ये १३ भाषा, २३ डोमेन- विशिष्ट विषय आणि जनरल एप्टिट्यूड टेस्ट (GAT) यांचा समावेश होता. (Latest Education News)
या सोप्या स्टेप्सनी पाहा रिजल्ट
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील “CUET UG Result 2026” किंवा लिंकवर क्लिक करा.
नवीन पृष्ठ क्रमांक, अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा.
तुमचे गुणपत्रक स्क्रीनवर दिसेल.
ते डाउनलोड करा आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. (LS Marathi News Channel)






