Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सायंकाळी ४ वाजता कुरकुरे किंवा चिप्स रोज खाताय? थांबा… आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम
लाईफस्टाईल

सायंकाळी ४ वाजता कुरकुरे किंवा चिप्स रोज खाताय? थांबा… आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Kurkure and Chips Addictive

Kurkure and Chips Addictive: सायंकाळी भूक लागली की, अनेकजण चटकन कुरकुरे किंवा चिप्स खातात. मात्र, ही रोजची सवय आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती.

सायंकाळी ४ वाजता भूक लागली की लगेच कुरकुरे किंवा चिप्स खाण्याची सवय अनेकांना असते. टीव्ही पाहताना, ऑफिसमध्ये काम करताना किंवा पटकन काहीतरी खावंसं वाटलं की हातात कुरकुरे किंवा चिप्सचं पाकीट येतं. चवदार, टेस्टी आणि सहज उपलब्ध असल्यामुळे हे स्नॅक्स खूप लोकप्रिय झाले आहेत. मात्र, रोज यांचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही.

हेही वाचा: मोठी बातमी! राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

कुरकुरे आणि चिप्स इतके आकर्षक का वाटतात?

कुरकुरे आणि चिप्समध्ये मीठ तेल आणि विविध फ्लेवर्सचे मिश्रण असते. त्यामुळे त्यांची चव अधिक आकर्षक वाटते. कुरकुरे पोट आणि मसालेदार चवीमुळे किती प्रमाणात चिप्स खाल्ले जात आहेत, याचे भान राहत नाही त्यांचे अतिसेवन होण्याची शक्यता वाढते.

रोज कुरकुरे आणि चिप्स खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम

1. रक्तदाब वाढण्याचा धोका

पॅकेटबंद कुरकुरे/ चिप्समध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढून रक्तदाब वाढू शकतो. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

2. वजन वाढण्याची शक्यता

कुरकुरे/ चिप्समध्ये कॅलरी जास्त आणि पोषणमूल्य कमी असते. त्यामुळे वारंवार सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, विशेषतः शारीरिक हालचाल कमी करणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो.

3. वाईट (LDL) कोलेस्टेरॉल वाढणे

काही कुरकुरे/ चिप्स तयार करताना कमी दर्जाचे किंवा वारंवार वापरलेले तेल वापरले जाते. त्यामुळे शरीरातील LDL (वाईट कोलेस्टेरॉल) वाढून हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

4. पचनाच्या समस्या

जास्त प्रमाणात चिप्स आणि कुरकुरे खाल्ल्यास गॅस, अॅसिडिटी, पोटफुगी अशा समस्या उद्भवू शकतात. फायबर कमी आणि प्रक्रिया केलेले घटक जास्त असल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.

5. मुलांच्या आहारावर परिणाम

लहान मुलांना कुरकुरेआणि चिप्सची सवय लागल्यास ते पौष्टिक घरगुती अन्न, फळे आणि भाज्या कमी प्रमाणात खाऊ लागतात. त्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

6. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

अशा प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात. त्यामुळे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याची शक्यता असते.

कुरकुरे आणि चिप्सऐवजी काय खाऊ शकता?

भूक लागल्यावर चिप्सऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते.

भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि बिया
ताजी फळे
कमी मीठाचे घरगुती पॉपकॉर्न
भाजलेले मखाणे
काकडी, गाजर यांसारख्या भाज्यांचे तुकडे आणि हेल्दी डिप्स

हे पर्याय चवदार तर असतातच, शिवाय शरीराला आवश्यक पोषक घटकही पुरवतात आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरतात.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts