Raj Thackeray: राजकारणात आणि समाजकारणात जनमानसात नेत्यांचे वर्तन कायमच चर्चेचा विषय असते. विशेषतः जेव्हा एखादा नेता स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी किंवा विचारांसाठी आक्रमक भूमिका घेतो आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा मैत्रीच्या संबंधात पूर्णपणे परस्पर विरोधी वर्तन करतो, तेव्हा सामान्य जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
असाच एक विरोधाभास सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर अत्यंत ज्वलंत चर्चेचा विषय बनला आहे. हिंदूत्वाचा टेंभा मिरवणारे, मराठी अस्मितेचा आणि हिंदूंच्या हक्कांचा पुरस्कार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला हजेरी लावली (Aamir Khan Third Marrige Attend), आणि यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
आमिर खानने नुकतेच ५ जुलै २०२६ रोजी वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी अतिशय खासगी आणि साध्या समारंभात गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. एका राजकीय नेत्याने, ज्यांचे संपूर्ण राजकारण हिंदूंच्या जीवावर चालते, त्यांनी एका मुस्लीम अभिनेत्याच्या अशा सोहळ्याला उपस्थित राहून आनंद साजरा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेत प्रचंड संताप आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा: उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये? आज ‘मातोश्री’वर आमदारांची महत्त्वाची बैठक; नेमकं असणार निर्णय
आमिर खानचं तिसर लग्न
आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नाविषयी बोलायचे झाल्यास, त्याने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रॅट या दीर्घकाळाच्या मैत्रिणीशी रजिस्टर पद्धतीने विवाह केला. गौरी स्प्रॅट हिच्यासोबत विवाह केल्यानंतर आमिर खानच्या आयुष्यातील हा तिसरा विवाह ठरला आहे. याआधी आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ता यांच्याशी पहिला विवाह केला होता, जो १६ वर्षांनंतर २००२ मध्ये मोडला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण राव यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, १६ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.
दोन दशकांपेक्षा जास्त काळ एकमेकांना ओळखत असलेल्या आमिर आणि गौरी यांनी दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्नाचा निर्णय घेतला. मुंबईतील पाली हिल, वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला अवघ्या १०० ते १५० नातेवाईक आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती होती. या सोहळ्यात आमिरची आधीच्या दोन्ही पत्नींपासून झालेली मुले—जुनैद खान आणि इरा खान—तसेच गौरीचा आधीच्या लग्नाचा मुलगाही उपस्थित होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरेंसह उपस्थित
या अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक लग्न सोहळ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पत्नी शर्मिला ठाकरेंसह आवर्जून उपस्थित राहिले होते. लग्नविधी पूर्ण झाल्यानंतर आमिर खान आणि त्याची पत्नी गौरी जेव्हा पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आले, तेव्हा राज ठाकरे आणि आमिर यांच्यातील दिलखुलास संवाद आणि हास्यविनोद कॅमेऱ्यात कैद झाले.
राज ठाकरे आणि आमिर खान एकमेकांना गाडीपर्यंत सोडायला गेले, तिथे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह तिघेही मनमोकळे हसताना दिसले. राज ठाकरे यांनी आमिर खानला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि दोघांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांना मिठी मारली.
राज ठाकरे आणि आमिर खान यांच्यातील मैत्री केवळ आताची नसून अनेक वर्षांची आहे. याआधीही ईदच्या निमित्ताने राज ठाकरे आपल्या कुटुंबासह आमिर खानच्या घरी गेले होते. आमिर खानदेखील अनेकदा महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाताना दिसला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या या मैत्रीपूर्ण संबंधांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज ठाकरे यांनी नेहमी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार
राजकारणाच्या पटलावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेहमीच प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रात विविध सण-उत्सव, हिंदूंच्या यात्रा, आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘हिंदू जननायक’ म्हणून ते स्वतःच्या कार्यकर्त्यांसमोर आणि जनतेसमोर प्रतिमा मांडत असतात. अशा परिस्थितीत, ज्या आमिर खानवर अनेकदा काही घटकांकडून हिंदू संस्कृती आणि हिंदू भावना दुखावल्याचे आरोप झाले, त्याच आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहतात, हे सामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही.
आमिर खानचं एकदा नाही, तर तीन-तीन वेळा हिंदू मुलींशी लग्न
आमिर खाननं अलिकडेच तिसऱ्यांदा विवाह केला आणि तो विवाह एका हिंदू मुलीशी झाला आहे. हिंदूत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या राज ठाकरेंना आमिर खान जवळचा वाटतो आणि तीन-तीन वेळा हिंदू मुलींशी लग्न करणाऱ्या या अभिनेत्याचे कृत्य राज ठाकरेंना खटकत नाही, अशी टीका आता समाजमाध्यमांवर केली जात आहे. सामान्य हिंदू कार्यकर्त्यांच्या रक्ताचे पाणी करून, त्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी मुस्लीम दोस्तांसाठी अशी सोयीची भूमिका घेणे म्हणजे हिंदुत्वाचा सोयीस्कर वापर असल्याचे विरोधक आणि संतापलेले कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.
तुमचा नेता काय करतोय?
राजकारण्यांची रणनीती आणि सामान्य जनतेच्या भावना यामध्ये नेहमीच एक मोठी दरी असते. राज ठाकरे आणि आमिर खान यांच्यातील या मैत्रीचा विषय निघाल्यावर सामान्य कार्यकर्त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे की, ‘तुमचा नेता काय करतोय?’. एका बाजूला धर्माचे रक्षण आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगण्याच्या गोष्टी केल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आयुष्यात तीन वेळा हिंदू मुलींशी लग्न करणाऱ्या आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य न ठेवणाऱ्या एका मुस्लीम सेलिब्रिटीच्या आनंदात सहभागी होऊन मिठी मारली जाते.
कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या नादी लागून एकमेकांशी द्वेष करणे किंवा एकमेकांच्या जीवावर उठणे, हा मूर्खपणा ठरू शकतो. नेत्यांच्या अशा दुटप्पी धोरणांमुळे सामान्य लोकांमध्ये कटुता निर्माण होते, मात्र नेत्यांचे वैयक्तिक संबंध आणि हितसंबंध अबाधित राहतात. म्हणूनच, राजकीय नेत्यांच्या या खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे वास्तव आता कार्यकर्त्यांना आणि जनतेला समजून घ्यावे लागेल.
सोशल मीडियावर नेटिझन्स आणि राजकीय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त
आमिर खानच्या (Raj Thackeray) या तिसऱ्या लग्नावरून निर्माण झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर नेटिझन्स आणि राजकीय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरेंसारख्या प्रखर हिंदूत्ववादी नेत्याने अशा सोहळ्याला हजेरी लावल्यामुळे त्यांच्यावर थेट टीका केली जात आहे.
अनेक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे विचारले आहे की, जर राज ठाकरे हिंदूंचे नेते आहेत, तर ते तीन-तीन हिंदू मुलींशी लग्न करणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नात मटण हंडी हादडायला कशाला गेले होते? राजकारण्यांचे वर्तन हे सामान्य जनतेसाठी एक आदर्श असायला हवे, परंतु जेव्हा नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वैयक्तिक मैत्रीसाठी तत्त्वांचा बळी देतात, तेव्हा जनतेचा लोकशाहीवरील आणि राजकारण्यांवरील विश्वास उडू लागतो.
धर्माच्या नावावर मतांचे राजकारण करायचे आणि ऐनवेळी मुस्लीम दोस्तांसाठी सोयीची भूमिका घ्यायची, हा राजकीय नेत्यांचा फार जुना खेळ झाला आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या अशा भूलथापांना बळी न पडता, स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे आणि नेत्यांच्या अशा खोट्या आणि सोयीस्कर भूमिकेला विरोध केला पाहिजे, असा सूर आता उमटू लागला आहे.
नेत्यांचे वैयक्तिक जीवन आणि राजकीय भूमिका या पूर्णपणे वेगळ्या
या नेत्यांच्या नादी लागून सामान्य जनतेने किंवा कार्यकर्त्यांनी आपापसांत वैर निर्माण करून घेणे किंवा एकमेकांशी दुश्मनी घेणे अजिबात योग्य नाही. नेत्यांचे वैयक्तिक जीवन आणि राजकीय भूमिका या पूर्णपणे वेगळ्या असतात. जेव्हा सत्तेची किंवा मैत्रीची वेळ येते, तेव्हा सारे राजकीय मतभेद आणि धार्मिक भिंती विसरून हे नेते एकत्र येतात. परंतु, सामान्य कार्यकर्त्यांना मात्र धर्माच्या किंवा जातीच्या नावावर भडकवून एकमेकांच्या अंगावर सोडले जाते.
राज ठाकरे आणि आमिर खान यांच्यातील ही जवळीक पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, पडद्यामागे सर्वच नेते एकमेकांचे मित्र असतात. त्यांच्यात कोणताच जातीभेद किंवा धर्मभेद नसतो. भेद असतो तो फक्त सामान्य कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या मनात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा विचार करणे नितांत गरजेचे आहे की, जर आपले नेते स्वतः व्यक्तिगत जीवनात अशा लोकांच्या सोबत उठतात-बसतात आणि आनंद साजरी करतात, तर मग आपण कशासाठी नेत्यांच्या मागे धावून एकमेकांशी दुश्मनी घेत आहोत?
हिंदूत्वावरती राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना आमिर खान जवळचा
राजकारणात ‘नेता नेताच असतो’. सामान्य जनतेला केवळ राजकीय पोळ्या भाजण्यासाठी वापरून घेतले जाते. हिंदूत्वावरती राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना आमिर खान जवळचा वाटतो, कारण बॉलिवूडमधील ग्लॅमर आणि श्रीमंती ही राजकारण्यांना कायमच आकर्षित करत असते.
आमिर खाननं तीन हिंदू मुलींशी लग्न केलं आणि आणि त्यातील दोन मुलींना तलाक दिले, याचं राज ठाकरेंना काहीच वावडं नाही वाटत. नेत्यांच्या या अशा वर्तनामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. एकीकडे हिंदू धर्माचा अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच धर्मातील मुलींशी वारंवार विवाह करणाऱ्या आणि नंतर त्यांना घटस्फोट देणाऱ्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी व्हायचे, ही कोणती हिंदू संस्कृती, असा प्रश्न विचारला जात आहे. नेत्यांचे हे वर्तन त्यांच्या दुटप्पीपणाची साक्ष देते.
राजकारणात येऊन नेत्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काम करणे अपेक्षित असते, मात्र येथे तर नेते केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी आणि सेलिब्रिटी मित्रांच्या लग्नसमारंभात नाचण्यासाठी वेळ काढत आहेत. हे लक्षात ठेवा…












