Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • रविकांत तुपकरांचे आक्रमक आंदोलन; शेतकरी झाडावर चढले, सरकारविरोधात घोषणाबाजी
राजकारण

रविकांत तुपकरांचे आक्रमक आंदोलन; शेतकरी झाडावर चढले, सरकारविरोधात घोषणाबाजी

Farmer

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवन परिसरात जोरदार आंदोलन केले. यावेळी शेतकरी झाडावर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी विधानभवन परिसरात आक्रमक आंदोलन केले. सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पीकविमा आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत तुपकर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले.

हेही वाचा: ऐन परीक्षेच्या तोंडावर पावसाचा अडथळा; आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ९ जुलैच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

शेतकरी झाडावर चढले

आंदोलनादरम्यान काही शेतकरी झाडावर चढले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. यामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.

शेतमालाच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा

तुपकर (Ravikant Tupkar) आणि त्यांच्या समर्थकांनी शेतमालाच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी, पीकविमा आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत रविकांत तुपकर यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन

यापूर्वीही रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून शेतकरी प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मागण्यांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांवरून झालेल्या या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts