Breaking News :
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! GATE 2027 ची अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु होणार; थेट गुणांवरून मिळणार नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
शैक्षणिक बातम्या

इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! GATE 2027 ची अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु होणार; थेट गुणांवरून मिळणार नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

GATE 2027
GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून उमेदवारांना 14 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

GATE 2027 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) 2027 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 14 ऑगस्ट 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे. तसेच, विलंब शुल्कासह उमेदवारांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

GATE गुणांच्या आधारे केवळ IIT, NIT, IIIT आणि IISc सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळत नाही, तर अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (PSU) नोकरी मिळवण्याचा मार्गही खुला होतो.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा, पात्रता काय आहे, अर्ज शुल्क किती आहे आणि परीक्षेसंदर्भातील संपूर्ण A टू Z माहिती जाणून घेऊया.

हेही वाचा: NEET रद्दच करा’; विजय थलपतींची केंद्र सरकारकडे मोठी मागणी, राहुल गांधींच्या ताब्यावर नेमकं काय म्हणाले?

GATE २०२७ चे वेळापत्रक

१४ ऑगस्ट २०२६ : अर्ज प्रक्रिया सुरू
२१ सप्टेंबर २०२६ : अर्जाची अंतिम तारीख (विलंब शुल्काशिवाय)
३० सप्टेंबर २०२६ : विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख
१४ ते २१ ऑक्टोबर २०२६ : अर्जामध्ये दुरुस्तीची संधी
४ जानेवारी २०२७: परीक्षा केंद्र (City Allotment) जाहीर
६,७,१३,१४,२० आणि २१ फेब्रुवारी २०२७: GATE परीक्षा
१९ मार्च २०२७: निकाल जाहीर

अर्ज कोण करू शकतो? (Eligibility Criteria for GATE 2027)

इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी तसेच इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, विज्ञान, वाणिज्य, कला आणि मानवविद्या शाखेतील पदवीधर GATE २०२७ साठी अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

सामान्य / OBC: २,००० (२१ सप्टेंबरपर्यंत), २५०० (विलंब शुल्कासह)
SC / ST / PwD: १००० (सामान्य शुल्क), १५०० (विलंब शुल्कासह)

GATE गुणांच्या आधारे कुठे प्रवेश मिळतो?

GATE गुणांच्या आधारे IIT, NIT, IIIT आणि IISc बेंगळुरू येथे M.Tech, MS आणि PhD अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. प्रवेश प्रक्रिया CCMT समुपदेशनाद्वारे पार पडते.

GATE गुण किती वर्षे वैध असतात?

उच्च शिक्षणासाठी: ३ वर्षे
PSU भरतीसाठी: १ वर्ष

ही वैधता निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून मोजली जाते.

GATE गुणांच्या आधारे नोकरी देणाऱ्या PSU

GATE गुणांच्या आधारे खालील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या भरती करतात:

ओएनजीसी (ONGC)
आयओसीएल (IOCL)
बीपीसीएल (BPCL)
एचपीसीएल (HPCL)
कोल इंडिया लिमिटेड (CIL)
गेल (GAIL)
पॉवरग्रीड (POWERGRID)
सेल (SAIL)
बीएचईएल (BHEL)
एनएचएआय (NHAI)
आरव्हीएनएल (RVNL)
आयआरकॉन (IRCON)
डीआरडीओ (DRDO)
बीएआरसी (BARC)
इस्रो (ISRO) आणि इतर कोणतीही सरकारी संस्था

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU) नोकरी कशी मिळवावी?

अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्या गेट (GATE) गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड करतात. त्यानंतर उमेदवारांना बैठकीसाठी किंवा गटचर्चेसाठी बोलावले जाते. काही कंपन्यांमध्ये स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जात नाही.

तुम्हाला कोणत्या पदावर संधी मिळते?

गेट (GATE) पात्र उमेदवारांना प्रामुख्याने ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET) किंवा इंजिनिअर/ऑफिसर या पदावर नियुक्ती मिळते.

मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल: प्रकल्प व्यवस्थापन, प्लांट ऑपरेशन, देखभाल

कॉम्प्युटर सायन्स / आयटी: सॉफ्टवेअर, सायबर सुरक्षा, डेटा व्यवस्थापन

इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन: नियंत्रण प्रणाली, ऑटोमेशन, तांत्रिक कार्य

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना कायमस्वरूपी पदांवर नियुक्त केले जाते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts