Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • ‘रामायण’चा ट्रेलर आज नाही होणार रिलीज; जाणून घ्या पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण
मनोरंजन

‘रामायण’चा ट्रेलर आज नाही होणार रिलीज; जाणून घ्या पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण

Ramayana Trailer Delayed
Ramayana Trailer Delayed: रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना प्रतीक्षा होती. मात्र ट्रेलर रिलीज पुढे ढकलण्यात आला असून, यामागचे नेमके कारण काय आहे, जाणून घेऊया.

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होणार होता. मात्र आता ट्रेलर लॉन्च पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

२४ जुलै रोजी ‘रामायण’ चा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र काही तास आधीच ट्रेलर रिलीजचा निर्णय बदलण्यात आला. निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबतभागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ट्रेलर जागतिक स्तरावर नवीन तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे.

हेही वाचा: ट्रम्प यांचा ‘टॅरिफ स्ट्राईक’; भारतासह 60 देशांवर अमेरिकेचा नवा व्यापार नियम, जाणून घ्या परिणाम

“रामायण”चा ट्रेलर का पुढे ढकलण्यात आला?

नमित मल्होत्रा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले की, ‘रामायण’साठी हा एक महत्वाचा क्षण आहे. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबत झालेल्या भागीदारीमुळे हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत वितरण करार झाल्यामुळे चित्रपटाला जागतिक स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ट्रेलर आता अधिक मोठ्या पातळीवर, जगभरात एकाच वेळी लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘रामायण’ची स्टारकास्ट आणि दिग्दर्शक

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग यावर्षी नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये दाखल होईल, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार असून, यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय रवी दुबे, सनी देओल, रकुल प्रती सिंह, लारा दत्ता, अरुण गोविल, विवेक ओबेरॉय आणि कुणाल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

निवडक मीडिया आणि चाहत्यांनी पाहिला ट्रेलर

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये काही निवडक मीडिया प्रतिनिधी आणि चाहत्यांसाठी ‘रामायण’चा ट्रेलर दाखवण्यात आला होता. या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह आणि रवि दुबे यांची झलक पाहायला मिळाली. आता या चित्रपटाचा ट्रेलर जागतिक स्तरावर कधी प्रदर्शित होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts