Ramayana 2026 Movie: रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ती माता सुमित्रेची भूमिका साकारणार आहे.
रणवीर कापूर (Ranbir Kapoor’s) स्टारर ‘रामायण’ चित्रपटाची (Ramayana Movie) उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील भव्य सेट, व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी (Sai Pallavi) आणि रावणाच्या भूमिकेत यश दिसणार आहेत. मात्र, या मोठ्या स्टारकास्टसोबतच टीव्ही विश्वातील दोन लोकप्रिय अभिनेत्रीही महत्वाच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
या अभिनेत्रींपैकी एक माता सुमित्रेची भूमिका साकारणार आहे, तर दुसरी अभिनेत्री लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा: तुम्हीही फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवता का? थांबा! यामुळे चव आणि गुणवत्ता होऊ शकते खराब
‘बालिका वधू’ फेम सोनल झा साकारणार माता सुमित्रा (Balika Vadhu Actress)
‘रामायण’ (Ramayana Movie) च्या ट्रेलरमध्ये राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्यांची झलक पाहायला मिळते. यामध्ये माता कौशल्येच्या भूमिकेत इंदिरा कृष्णन आणि माता कैकयीच्या भूमिकेत लारा दत्ता दिसत आहेत.
तर राजा दशरथ यांच्या तिसऱ्या पत्नी म्हणजेच माता सुमित्रेची भूमिका अभिनेत्री सोनल झा (Sonal Jha) साकारत आहेत.
सोनल झा या टीव्ही क्षेत्रातील ओळखीच्या अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेत ईरावतीची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘ना आना इस देश लाडो’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
चित्रपट आणि ओटीटीवरही सोनल झा यांची छाप
टीव्ही मालिकांबरोबरच सोनल झा यांनी चित्रपट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम केले आहे. ‘चिल्लर पार्टी’, ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ आणि ‘आगरा’ या चित्रपटांमध्ये त्या सहाय्यक भूमिकेत दिसल्या आहेत.
ओटीटी क्षेत्रात त्यांनी ‘सनफ्लॉवर’, ‘भय: द गौरव तिवारी मिस्ट्री’ आणि ‘द पिरामिड स्कीम’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.
आता ‘रामायण’मध्ये त्या रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सोनिया बलानी उर्मिलाच्या भूमिकेत
‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाची भूमिका अभिनेत्री सोनिया बलानी साकारणार आहे. सोनिया बलानी यांना टीव्ही मालिकांमधून मोठी ओळख मिळाली आहे.
त्यांनी ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘डिटेक्टिव दीदी’, ‘कौन है?’ आणि ‘तू मेरा हीरो’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
सोनिया यांनी बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले असून, २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन 2’ चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर त्या ‘बाजार’ या चित्रपटात दिसल्या.
मात्र, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातील आसिफाच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
FAQs
1. ‘रामायण’ चित्रपटात माता सुमित्रेची भूमिका कोण साकारत आहे?
उत्तर: ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री सोनल झा ‘रामायण’ चित्रपटात माता सुमित्रेची भूमिका साकारत आहेत.
2. ‘रामायण’मध्ये भगवान रामाची भूमिका कोण करत आहे?
उत्तर: चित्रपटात भगवान रामाची भूमिका रणबीर कपूर साकारत आहेत, तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहेत.
3. उर्मिलाची भूमिका कोण साकारत आहे?
उत्तर: अभिनेत्री सोनिया बलानी ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाची भूमिका साकारत आहेत.
4. ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका कोण करत आहे?
उत्तर: अभिनेता यश या चित्रपटात रावणाची दमदार भूमिका साकारत आहेत.








