AIIMS CRE 5 Re Exam: AIIMS CRE-5 भरती परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ७ ग्रुप कोडमधील उमेदवारांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असून, जुन्या परीक्षेचे गुण अंतिम निवड प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार नाहीत.
AIIMS नवी दिल्लीने कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE)- ५ २०२६ संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. परीक्षेतील काही ग्रुप कोडसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.
हेही वाचा: तुम्हीही फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवता का? थांबा! यामुळे चव आणि गुणवत्ता होऊ शकते खराब
AIIMS ने स्पष्ट केले आहे की, या ७ ग्रुप कोडसाठी यापूर्वी झालेल्या परीक्षेचे गुण अंतिम निवड प्रक्रियेसाठी वापरले जाणार नाहीत. उमेदवारांची निवड आता री- एक्झामच्या निकालाच्या आधारे केली जाईल.
परीक्षा कधी झाली होती? (AIIMS Recruitment 2026)
AIIMS CRE-5 परीक्षा २५ ते २७ जुलै २०२६ दरम्यान देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करून आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर काही ग्रुप कोडसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
संस्थेने सांगितले आहे की, हा निर्णय फक्त निवडक ७ ग्रुप कोडसाठी लागू आहे. इतर पदांसाठी अर्ज केलेल्या आणि परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या ७ ग्रुप कोडसाठी होणार री- एक्झाम (AIIMS Re- Exam 2026)
AIIMS च्या निर्णयानुसार खालील ग्रुप कोडमधील उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल:
ग्रुप कोड ३:
डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड-A, ज्युनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, LDC आणि UDC
ग्रुप कोड २०:
पर्सनल असिस्टंट, पीए टू प्रिन्सिपल, स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरी
ग्रुप कोड २८:
असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर
ग्रुप कोड ३२:
ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर (रिसेप्शनिस्ट), रिसेप्शनिस्ट
ग्रुप कोड ३३:
ज्युनियर वॉर्डन, वॉर्डन आणि हॉस्टेल वॉर्डन
ग्रुप कोड ४८:
टेलिफोन ऑपरेटर
ग्रुप कोड ५८:
सोशल सिक्युरिटी ऑफिसर, मॅनेजर ग्रेड-II, सुपरिंटेंडेंट आणि सोशल सिक्युरिटी ऑफिसर (ऑडिट)
कोण उमेदवार देऊ शकतील पुन्हा परीक्षा?
AIIMS च्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांना या ७ ग्रुप कोडसाठी यापूर्वी प्रवेशपत्र मिळाले होते, त्यांना री- एक्झाममध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल.
मात्र, उमेदवारांची पात्रता आणि परीक्षा नोंदींची तपासणी केल्यानंतरच अंतिम पात्र उमेदवार निश्चित केले जातील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र दिले जाईल.
परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार
AIIMS कडून री-एक्झामची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. संस्थेने सांगितले आहे की, परीक्षेची माहिती उमेदवारांना किमान १० दिवस आधी दिली जाईल.
नवीन परीक्षा तारीख, प्रवेशपत्र आणि इतर आवश्यक सूचना AIIMS च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच उमेदवारांच्या लॉगिन डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिल्या जातील.
इतर उमेदवारांवर परिणाम नाही
CRE-5 मधील इतर सर्व ग्रुप कोडसाठी भरती प्रक्रिया पूर्वीच्या नियोजनानुसार सुरू राहणार आहे. संबंधित पदांचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर केले जातील.
तसेच मूळ भरती जाहिरात, त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना आणि सुधारित आदेश (Corrigendum) पुढील प्रक्रियेतही लागू राहतील.









