IBPS Clerk Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. IBPS ने ११ हजार ४०३ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि पात्रतेची माहिती जाणून घेऊया.
तुम्हीही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ( IBPS)ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट (CSA) म्हणजेच लिपिक संवर्गातील ११,४०३ पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे, जाणून घ्या.
हेही वाचा: ऑगस्टमध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा दुर्मीळ योग; भारतात सूतक लागणार का?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत IBPS च्या www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये (प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा) पार पडणार आहे.
या १० पेक्षा अधिक सरकारी बँकांमध्ये होणार नियुक्त
IBPS CSA Recruitment 2026 अंतर्गत देशातील अनेक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये:
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
इंडियन बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
पंजाब नॅशनल बँक
पंजाब अँड सिंध बँक
युको बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
यांसह इतर सहभागी बँकांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता (IBPS Clerk Eligibility)
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारमान्य विद्यापीठ किंवा संस्थेची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
२१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उमेदवाराची पदवी पूर्ण झालेली असावी.
संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
संगणकाचे किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज केला आहे, तेथील स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (IBPS Age Limit)
१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय: किमान वय: २० वर्षे, कमाल वय: २८ वर्षे असावे.
आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट
SC/ST प्रवर्ग: ५ वर्षे सूट
OBC प्रवर्ग: ३ वर्षे सूट
दिव्यांग उमेदवार: १० वर्षे सूट
निवड प्रक्रिया (IBPS Selection Process)
IBPS CSA पदांसाठी उमेदवारांची निवड दोन स्तरांतील परीक्षेद्वारे केली जाणार आहे. प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी पात्र ठरवले जाईल. बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती एक मोठी संधी ठरणार आहे.






