Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भाजपवर टीकेनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या भेटीला; ‘वर्षा’वरील भेटीमागे नेमकं काय कारण?
राजकारण

भाजपवर टीकेनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या भेटीला; ‘वर्षा’वरील भेटीमागे नेमकं काय कारण?

Raj Thackeray
13

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Raj Thackeray Meets Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ (Varsha Bungalow) या शासकीय निवासस्थानी पोहोचले.

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा मनसे (MNS News)  अध्यक्षांकडून भाजपच्या (BJP News) केंद्र आणि राज्यातील नेतृत्वावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांना भेटल्याने या भेटीमागील नेमक्या कारणाबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

हेही वाचा: आज सूर्यग्रहण! गर्भवती महिलांनी काय करावे, काय टाळावे? जाणून घ्या A टू Z माहिती एका क्लिकवर

गेल्या काही दिवसांपासून भाजपवर राज ठाकरेंचा निशाणा

राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या विविध नेत्यांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली आहे. Latest Marathi News

‘जेन-झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ( Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची फडणवीसांसोबत झालेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय जवळिकीचा परिणाम राज्यातील आगामी राजकारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या काळात राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपच्या भूमिकांवर अधिक आक्रमकपणे भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच आता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट अनेक अर्थांनी चर्चेचा विषय ठरली आहे.

शिवाजी पार्कमधील जिमखान्याचा मुद्दा चर्चेत

दरम्यान, राज ठाकरे यांच्या ‘वर्षा’वरील भेटीमागे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील जिमखान्याशी संबंधित विषय असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. त्यामुळे जिमखान्याशी संबंधित प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचाही विषय?

याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वतः या महामार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी रस्त्याच्या कामाच्या स्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करू शकतात.

भेट अचानक नव्हती?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट अचानक ठरलेली नसल्याची माहिती आहे. या बैठकीचे नियोजन काही दिवस आधीच करण्यात आले होते आणि त्यानुसार राज ठाकरे आज सकाळी ‘वर्षा’वर पोहोचले.

गेल्या काही दिवसांपासून भाजपवर आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे आता मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीत कोणते मुद्दे मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांची भूमिका काय असेल आणि या बैठकीचा आगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts