Solar Eclipse 2026: आज, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यग्रहण होत आहे. ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काय करावे, काय टाळावे आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी? जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.
आज, १२ ऑगस्ट २०२६ रोजी (Solar Eclipse 2026) वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण असून भारतातून ते दिसणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहता येणार नसले, तरी सूर्यग्रहणाबाबतच्या धार्मिक मान्यता आणि परंपरांमध्ये अनेकांना उत्सुकता असते. विशेषतः गर्भवती महिलांनी (Pregnant Women) ग्रहणाच्या काळात काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत विविध समजुती प्रचलित आहेत.
सूर्यग्रहण कधी सुरू होईल? (Date, Time and Visibility)
आज, १२ ऑगस्ट २०२६ रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan) होत आहे. या सूर्यग्रहणाची सुरुवात १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी होणार असून, रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी ग्रहणाची कमाल अवस्था असेल. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल. या ग्रहणाचा एकूण कालावधी ४ तास २४ मिनिटांचा असेल.
सूर्यग्रहणाच्या काळात काय करावे?
धार्मिक मान्यतांनुसार गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. तसेच महिलांनी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहू नये, अशी धामिर्क मान्यता आहे. ग्रहण पाहिल्याने बळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. त्यामुळे अत्यंत आवश्यक असल्यासच गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडावे.
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी (Pregnant Women) शिवणकाम, भरतकाम इत्यादी कामे करू नयेत. असे केल्याने आई आणि बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.
सूर्यग्रहणाच्या (Solar Eclipse 2026) काळात गर्भवती महिलांनी भाजी इत्यादी कापू नये, अशीही धार्मिक मान्यता आहे. मात्र, गर्भवती महिला या काळात भोजन करू शकतात. भोजनामध्ये ग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीची पाने किंवा दूर्वा ठेवाव्यात, असे सांगितले जाते.
असे म्हटले जाते की ग्रहणाच्या काळात झोपू नये. या काळात शक्य असल्यास जप करत राहावे. मात्र, तब्येत ठीक नसल्यास काही वेळ विश्रांती घेऊन झोपता येते. (Ls Marathi News channel)
गर्भवती महिलांनी काय करू नये?
सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी (Pregnant Women) स्नान करावे. स्नान करणे शक्य नसल्यास स्वतःवर गंगाजल शिंपडावे, अशी धार्मिक मान्यता आहे.
सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी स्नान करावे आणि त्यानंतर देवासमोर जाऊन हात जोडून प्रार्थना करावी. Latest Marathi News
भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही (Solar Eclipse Be Visible in India?)
12 ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2026) आता कर्क राशीत होणार आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण असेल. मात्र, ते भारतातून दिसणार नाही.
सूर्यग्रहण कुठे दिसणार? (Solar Eclipse 2026)
हे ग्रहण युरोपमधील बहुतांश देश, उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील देश, कॅनडा आणि रशियाच्या ईशान्य भागातून पाहता येईल.
याशिवाय ग्रीनलँड, आइसलँड, आर्क्टिक, अटलांटिक महासागर, उत्तर स्पेन आणि पोर्तुगालच्या सुदूर ईशान्य भागातूनही हे ग्रहण दिसेल. तसेच इटली, ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपमधील बहुतांश देशांमध्ये हे सूर्यग्रहण पाहता येईल.
टीप: वरील मजकूर धार्मिक मान्यता आणि परंपरांवर आधारित आहे. गर्भावस्थेत खाणे, पिणे, झोपणे किंवा बाहेर जाण्याबाबत वैद्यकीयदृष्ट्या सूर्यग्रहणामुळे विशेष निर्बंध असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत.






