Ollie Robinson: क्रिकेटच्या मैदानावर विक्रम आणि विक्रमी कामगिरीसोबत काही भन्नाट किस्सेही घडत असतात.
इंग्लड आणि पाकिस्तान (England vs Pakistan Test) यांच्यातील लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावरील पहिल्या कसोटीत असाच एका अनोखा प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तानचा पहिला डाव केवळ १७१ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर इंग्लंडचे वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन आणि जोश टंग यांनी सामन्यातील चेंडूच आपापसात वाटून घेतला.
विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या डावात दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे हा चेंडू नेमका कुणाच्या ताब्यात द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर दोघांनीही यावर भन्नाट तोडगा काढला.
मॅच बॉलच केले दोन समान भाग
पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर रॉबिन्सन आणि टंग यांनी हेडिंग्लेच्या ग्राउंड स्टाफच्या मदतीने मॅच बॉलचे मधोमध दोन भाग केले. त्यानंतर दोघांनी प्रत्येक अर्धा चेंडू आपल्या आठवणीसाठी जपून ठेवला.
एकाच डावात दोन्ही गोलंदाजांनी पाच- पाच विकेट्स घेतल्याने ही कामगिरी त्यांच्यासाठी खास होती. त्यामुळे सामना संपल्यानंतर बॉलची विभागणी करण्याची कल्पना दोघांना योग्य वाटली.
रॉबिन्सनने सांगितले की, मैदानातून बाहेर पडताना त्याने टंगला चेंडू अर्धा-अर्धा वाटून घेण्याची कल्पना सुचवली. टंगलाही हा विचार आवडला. अशा प्रकारची कामगिरी वारंवार घडत नसल्याने या सामन्याची आठवण म्हणून चेंडूचा अर्धा भाग जपून ठेवण्याचा निर्णय दोघांनी घेतला.
( LS Marathi News Channel )
पहिल्याच चेंडूवर रॉबिन्सनचा धक्का
रॉबिन्सनने सामन्याची सुरुवातच पाकिस्तानला मोठा धक्का देत केली. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवत त्याने इंग्लंडसाठी दबावाचे वातावरण तयार केले. त्यानंतर जोश टंगनेही प्रभावी गोलंदाजी करत पाकिस्तानच्या खालच्या फळीला जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही.
दोन्ही गोलंदाजांच्या शानदार स्पेलमुळे पाकिस्तानचा पहिला डाव 171 धावांवर आटोपला. दोघांनी मिळून पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडून काढला आणि त्याचबरोबर स्वतःच्या नावावर एक संस्मरणीय कामगिरीही नोंदवली.
<
So, what did they do with the match ball? 🤔
A simple solution to a unique problem!
Click below for the full interview:
— England Cricket (@englandcricket) August 19, 2026
h3>2006 नंतर इंग्लंडसाठी पुन्हा अशी कामगिरी
पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या दोन गोलंदाजांनी एकाच डावात प्रत्येकी पाच विकेट्स घेण्याची ही 16वी वेळ ठरली. विशेष म्हणजे, इंग्लंडकडून अशी कामगिरी यापूर्वी 2006 मध्ये झाली होती.
त्या वेळी ओल्ड ट्रॅफर्ड येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्टीव्ह हार्मिसन आणि मोंटी पानेसर यांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेतल्या होत्या. तब्बल दोन दशकांनंतर रॉबिन्सन आणि टंग यांनी या यादीत आपले नाव जोडले.
मात्र यावेळची गोष्ट केवळ आकडेवारीपुरती मर्यादित राहिली नाही. दोन गोलंदाजांनी आपापल्या पाच विकेट्सच्या कामगिरीची आठवण म्हणून मॅच बॉलचेच दोन भाग करून घेणे, हा क्रिकेटच्या मैदानावरील नक्कीच लक्षवेधी आणि दुर्मिळ किस्सा ठरला.



