Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रोहित पवारांच्या PAच्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू; 9:58 वाजता CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?
Pune

रोहित पवारांच्या PAच्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू; 9:58 वाजता CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?

Rohit Pawar PA Daughter Death
6
Rohit Pawar PA Daughter Death: रोहित पवारांच्या PAच्या मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आईसोबत किरकोळ वादानंतर ती घरातून बाहेर पडली होती. CCTV मध्ये 9:58 वाजता ती लिफ्टने टेरेसकडे जाताना दिसली. त्यानंतर सकाळी तिचा मृतदेह आढळला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया…

बारामतीतील रुई परिसरात १२ वर्षीय मुलीच्या मृत्यूची (12 year old girl death) धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे PA अजित दशावतारे (Rohit Pawar PA Daughter Death) यांच्या मुलीचा मृतदेह रविवार सकाळी एका इमारतीजवळ आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

रात्री आईसोबत किरकोळ वाद, त्यानंतर घराबाहेर पडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी रात्री आई आणि मुलींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मुलगी रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही.

यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. २३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३.४० वाजता मुलीचे आई- वडील आणि काही नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले. मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा: दुसरा श्रावण सोमवार ठरणार खास! ‘या’ 7 राशींवर बरसेल भोलेनाथांची कृपादृष्टी? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

सकाळी दाखल झाला गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सकाळी 6:32 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी BNS कलम 137(2) अंतर्गत नोंद करण्यात आली.

दरम्यान, मुलीचा शोध सुरू असतानाच डायल 112 वरून पोलिसांना रूई परिसरातील स्वामी समर्थ बिल्डिंगजवळ एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांना बोलावले. त्यानंतर मृतदेह त्याच बेपत्ता मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले.

CCTV मध्ये महत्त्वाची माहिती

घटनेची माहिती मिळताच महिला उपनिरीक्षक धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमसह डिटेक्शन ब्रांचच्या पथकांनी तपास सुरू केला. ( LS Marathi News Channel )

पोलिसांनी स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या टेरेसची पाहणी केली. यावेळी टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. स्थानिक मुलांच्या मदतीने आणि शिडीच्या साहाय्याने पोलिसांनी टेरेसवर प्रवेश केला. तेथे मृत मुलीची चप्पल आढळून आली.

यानंतर इमारतीतील CCTV फुटेज (CCTV, Baramati police investigation) तपासण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री 9:58 वाजता मुलगी लिफ्टने वरच्या दिशेने जाताना CCTV मध्ये दिसून आली. या फुटेजमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

मृतदेहावर जखमा; हात-पायाला फ्रॅक्चर

प्राथमिक पाहणीत मुलीच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या जखमा आढळल्या. तसेच तिचा डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह पालथ्या अवस्थेत आढळून आला.

परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासाच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी मारली असावी, असा पोलिसांचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र, हा अंतिम निष्कर्ष नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: एकच आक्रोश… अमरावतीच्या NICU मध्ये भीषण आग; 3 नवजात चिमुकल्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

रोहित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार बारामतीत दाखल झाले. त्यांनी पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.

आपले PA अजित दशावतारे हे जिल्हा परिषदेपासून आपल्यासोबत काम करत असल्याचे सांगत रोहित पवार यांनी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणातील तपास आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

अंतिम सत्य PM रिपोर्टनंतरच समोर येणार

सध्या या प्रकरणाचा तपास विविध बाजूंनी सुरू आहे. CCTV फुटेज, घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी मृत्यूमागे नेमकं कारण काय, याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे.

या घटनेने लहान मुलांशी संवाद, त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणे आणि कुटुंबातील संवादाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. एका 12 वर्षीय चिमुकलीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागचं अंतिम सत्य स्पष्ट होईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts