Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • Janmashtami 2026 Wishes : ‘राधे-राधे’च्या गजरात साजरी करा गोकुळाष्टमी; प्रियजनांना WhatsAppवर पाठवा हे मनमोहक मेसेज
लाईफस्टाईल

Janmashtami 2026 Wishes : ‘राधे-राधे’च्या गजरात साजरी करा गोकुळाष्टमी; प्रियजनांना WhatsAppवर पाठवा हे मनमोहक मेसेज

Janmashtami 2026 Marathi Best Wishes
35
Janmashtami 2026 Marathi Best Wishes: यंदा ४ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या मंगलमय दिवसाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करा.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वत्र ‘ राधे- राधे’ चा गजर आणि कान्हाच्या नामस्मरणाने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या (Krishna Janmashtami Wishes) बालरूपाची पूजा केली जाते. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तर अनेक भाविक उपवास करून मध्यरात्री कृष्णजन्माचा (Gokulashtami) सोहळा साजरा करतात.

यंदा 4 सप्टेंबर 2026 रोजी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या मंगलमय दिवसाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि प्रिय व्यक्तींना सोशल मीडिया किंवा WhatsAppच्या माध्यमातून हटके शुभेच्छा पाठवता येतील. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश (Janmashtami Wishes Marathi ) येथे दिले आहेत.

हेही वाचा: Krishna Janmashtami 2026: आज मध्यरात्री जन्मणार बाळकृष्ण! जाणून घ्या जन्माष्टमीचा अचूक मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खास शुभेच्छा

1.
कान्हाच्या मुरलीसारखा
तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचा सूर घुमत राहो,
श्रीकृष्णाच्या कृपेने प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
आणि सुख-समृद्धीने जीवन फुलून जावो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

2.
नंदलालाच्या आशीर्वादाने
दुःख दूर जावो, सुखाचे क्षण वाढत जावोत,
आयुष्यातील प्रत्येक वाटचालीला
कान्हाची साथ आणि कृपादृष्टी लाभो.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

3.
यशोदेचा लाडका, नंदाचा कान्हा,
राधेच्या प्रेमाचा आणि गोपींच्या मनाचा राजा,
मुरलीच्या मधुर सुरांनी
तुमच्या आयुष्यात आनंद भरून राहो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

4.
दहीहंडीचा उत्साह,
मुरलीचा मधुर नाद,
राधा-कृष्णाच्या प्रेमाची गोडी
आणि कान्हाच्या आशीर्वादाची साथ…
यांनी तुमचे जीवन सदैव आनंदी राहो.
गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

5.
कृष्णाच्या हास्यात आनंद मिळो,
त्याच्या बासरीत प्रेमाचा सूर मिळो,
आणि त्याच्या आशीर्वादाने
आयुष्याला यशाची नवी दिशा मिळो.
जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts