Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा या ६ गोष्टींचे दान; घरात नांदेल सुख-समृद्धी
लाईफस्टाईल

श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा या ६ गोष्टींचे दान; घरात नांदेल सुख-समृद्धी

Janmashtami 2026
40
Janmashtami 2026: जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी पूजा अर्चनेसह दानधर्मालाही विशेष महत्व आहे. या दिवशी या ७ वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2026) हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी पूजा, उपवास आणि नामस्मरणासोबतच गरजू व्यक्तींना किंवा योग्य ठिकाणी दान करण्यालाही विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने श्रीकृष्णची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख- शांती व समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.

भगवान श्रीकृष्णांचे बालरूप, गोपाल रूप आणि गोकुळातील (Janmashtami Date 2026) त्यांच्या लीळांशी अनेक वस्तू जोडलेल्या आहेत. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी या वस्तूंचे दान किंवा अर्पण करणे शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया, जन्माष्टमीला कोणत्या वस्तूंचे दान करता येते.

हेही वाचा: 8वा वेतन आयोग येण्याआधीच DAची मोठी अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्याचे नवे गणित समोर

यंदा जन्माष्टमी 2026 कधी साजरी होणार?

यंदा जन्माष्टमीचा उत्सव 4 सप्टेंबर 2026, शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार अष्टमी तिथी 4 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल आणि 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होईल. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याची धार्मिक मान्यता असल्यामुळे जन्माष्टमीच्या रात्री विशेष पूजा आणि जन्मोत्सव साजरा केला जातो.

जन्माष्टमीला ‘या’ वस्तूंचे दान करा

1. अन्नदान

जन्माष्टमीच्या दिवशी अन्नदान करणे पुण्यकारक मानले जाते. गरजू, गरीब किंवा भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हा उत्तम सेवाभाव मानला जातो. आपल्या क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, डाळी किंवा तयार अन्नाचे दान करू शकता.

2. वस्त्रदान

या दिवशी गरजू व्यक्तींना स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे देणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास नवीन कपड्यांचे दान करावे. बालकांना कपडे देणेही या दिवशी विशेष मानले जाते.

3. लोणी आणि साखरेचे दान

बालकृष्णाला लोणी आणि साखर अत्यंत प्रिय असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवून त्याचे प्रसादरूपाने वाटप करता येते. गरजू व्यक्तींनाही या पदार्थांचे दान करणे शुभ मानले जाते.

4. मोरपिसांचे दान

मोरपिसाचा संबंध भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटाशी जोडला जातो. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात मोरपिस अर्पण करणे किंवा धार्मिक ठिकाणी त्याचे दान करणे शुभ मानले जाते.

5. बासरी अर्पण करा

भगवान श्रीकृष्णांच्या हातातील बासरी त्यांच्या स्वरूपाची खास ओळख आहे. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात बासरी अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. श्रद्धेनुसार यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

6. गायीला हिरवा चारा द्या

भगवान श्रीकृष्णांचे बालपण गोपाळांच्या सहवासात आणि गायींच्या सेवेत गेले, अशी धार्मिक कथा आहे. त्यामुळे जन्माष्टमीला गायीला हिरवा चारा खाऊ घालणे किंवा गोसेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ काळ

श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाल्याची मान्यता असल्याने जन्माष्टमीच्या दिवशी रात्री विशेष पूजा केली जाते. यंदा पूजेचा शुभ काळ रात्री 11:48 ते 12:43 असा सांगितला जात आहे.

या काळात लाडू गोपाळाची पूजा करून पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर नवीन वस्त्र, दागिने आणि फुलांनी बालकृष्णाला सजवून नैवेद्य दाखवावा.

लाडू गोपाळाला पिवळे वस्त्र का अर्पण करतात? 

भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाला विशेष स्थान आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळाला पिवळ्या (Laddu Gopal Puja) रंगाची वस्त्रे अर्पण करणे शुभ मानले जाते.

पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. श्रद्धेनुसार पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाचे नामस्मरण आणि पूजा केल्याने भक्तीभाव वाढतो.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts