Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’ च्या घरात मराठी तडका! पुण्याच्या ‘या’ रॅपरची दणदणीत एन्ट्री; जाणून घ्या १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी
मनोरंजन

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’ च्या घरात मराठी तडका! पुण्याच्या ‘या’ रॅपरची दणदणीत एन्ट्री; जाणून घ्या १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी

Bigg Boss 20 Contestants List
32
Bigg Boss 20 Contestants List: सलमान खानचा बहुचर्चित ‘बिगg बॉस २०’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ६ सप्टेंबरला झालेल्या ग्रँड प्रीमियरनंतर बिग बॉसच्या घरात १६ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली असून, यंदाच्या सीझनमध्ये ग्लॅमरसोबतच मराठी तडका देखील पाहायला मिळणार आहे.

गायक, अभिनेता, अभिनेत्री, रॅपर, सोशल मीडिया स्टार, इन्फ्लुएंसर आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील चेहरे यंदा बिग बॉसच्या घरात आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सीझनमध्ये मनोरंजनासोबतच जोरदार भांडणं, मैत्री, रणनीती आणि ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बिग बॉसच्या घरात मराठमोळ्या रॅपरचा जलवा!

यंदाच्या सीझनचं सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे पुण्याच्या मराठमोळ्या रॅपर युंग डीएसएची (Yung DSA) एन्ट्री झाली आहे. युंग डीएसएचं खरं नाव हर्ष विजय माचारे (Harsh Vijay Machare)  असून, तो पुण्यातील रॅपर म्हणून ओळखला जातो. देसी हिप-हॉप, दमदार ट्रॅप बीट्स आणि हटके अंदाजासाठी त्याची विशेष ओळख आहे.

आता बिग बॉसच्या घरात त्याचा रॅपिंग अंदाज किती भारी ठरतो आणि तो इतर स्पर्धकांना आपल्या खेळाने कसं टक्कर देतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी युंग डीएसाची एन्ट्री नक्कीच खास ठरणार आहे.

कोण कोण आहे बिग बॉस २०च्या घरात? (Bigg Boss 20 full list)

यंदाच्या सीझनमध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

माही विज
कनिका मान
आसिफ खान
अरिश्फा खान
काझी तौकीर
ईशा रिखी
रोहेद खान
लव्ह गिल
मेरी कोम
तन्मय सिंग उर्फ ScoutOP
गुल्लू उर्फ कुशल तन्वर
अमन गांधी
उदिती सिंग
रिती तिवारी
आम्रपाली दुबे
युंग डीएसए उर्फ हर्ष विजय माचारे

यंदाची थीम आहे तरी काय? (Bigg Boss 20 theme)

‘बिग बॉस २०’ची थीम ‘तथास-टू’ अशी असल्याचं सांगितलं जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांसाठी एक खास ‘अतिरिक्त जीवनदान’ ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. या ट्विस्टमुळे गेममध्ये कधीही अनपेक्षित वळण येऊ शकतं. त्यामुळे कोणता स्पर्धक किती काळ टिकतो, कोण कोणाची साथ देतो आणि कोण घरातील समीकरणं बदलतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पहिल्याच दिवसापासून रंगणार बिग बॉसचा खेळ!

ग्रँड प्रीमियरनंतर आता बिग बॉसच्या घरात खरी रंगत सुरू होणार आहे. पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये मतभेद आणि वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

सलमान खानच्या खास अंदाजातील होस्टिंगसोबत स्पर्धकांचा ड्रामा, नात्यांची गुंतागुंत, टास्क आणि भन्नाट ट्विस्ट यामुळे ‘बिग बॉस २०’चा हा सीझन प्रेक्षकांसाठी चांगलाच मनोरंजक ठरणार आहे.

विशेष म्हणजे यंदा बिग बॉसच्या घरात मराठी रॅपर युंग डीएसाने एन्ट्री घेतल्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता हा पुणेकर रॅपर बिग बॉसच्या घरात किती मोठा धमाका करतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस २०’ जिओ हॉटस्टारवर पाहता येणार असून, कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts