Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • GATE 2027 अर्जदारांसाठी मोठी बातमी! DigiLocker वेरिफिकेशन नसले तरी भरता येणार परीक्षा फॉर्म, कसे ते जाणून घ्या
एजुकेशन- जॉब

GATE 2027 अर्जदारांसाठी मोठी बातमी! DigiLocker वेरिफिकेशन नसले तरी भरता येणार परीक्षा फॉर्म, कसे ते जाणून घ्या

GATE 2027 Registration
5
GATE 2027 Registration: तुम्हीही GATE 2027 ची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता DigiLocker वेरिफिकेशन झालेले नसले तरी GATE 2027 साठी अर्ज करता येणार आहे. मात्र, त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? चला, जाणून घेऊया.

तुम्हीही GATE 2027 ची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. GATE परीक्षेसाठी अर्ज करताना DigiLocker वेरिफिकेशनबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता IIT मद्रासने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. DigiLocker खाते वेरिफाइड नसले तरी उमेदवारांना GATE 2027 साठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे वेरिफिकेशनला उशीर होत असल्याने फॉर्म भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाची संधी मिळणार आहे. मात्र, Unverified DigiLocker खात्याद्वारे अर्ज करताना काही नियम आणि कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्जाची अंतिम तारीख आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. चला, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा: 20 September 2026 Horoscope: ‘या’ राशींना होणार धनलाभ? जाणून घ्या आजचं तुमचं राशिभविष्य

DigiLocker वेरिफाइड नसेल तर काय करायचे?

GATE 2027 चा अर्ज भरताना उमेदवाराचे DigiLocker खाते वेरिफाइड नसल्यास घाबरण्याची गरज नाही. उपलब्ध पर्यायांमधून Default ID Proof निवडून अर्जाची प्रक्रिया पुढे नेता येणार आहे.

मात्र, अशा पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कागपत्रांची नंतर स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना दिलेली माहिती आणि कागदपत्रे अचूक असणे महत्वाचे आहे.

परीक्षा केंद्रावर होणार कागदपत्रांची तपासणी

Unverified DigiLocker खात्याचा वापर करून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी विशेष काळजी घ्यावी लागेल. अशा उमेदवारांनी मूळ फोटो ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत नेणे आवश्यक असेल.

मार्कशीट अपलोड

10वी, 12वी आणि पदवीची मार्कशीट अपलोड करायची गरज नाही. IIT मद्रासच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, GATE 2027 अर्जासाठी DigiLocker वर 10वी, 12वी किंवा पदवीची मार्कशीट अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

तथापि, SC, ST आणि PwD उमेदवारांना त्यांचे वैध श्रेणी प्रमाणपत्र DigiLocker Drive मधील ‘GATE2027’ फोल्डरमध्ये निर्धारित फॉरमॅटमध्ये अपलोड करावे लागेल.

अर्जाची अंतिम तारीख लक्षात ठेवा

GATE 2027 साठी विलंब शुल्काशिवाय अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2026 आहे. त्यानंतर उमेदवारांना विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2026 पर्यंतची मुदत मिळणार आहे.

IIT मद्रासने शक्य असल्यास उमेदवारांनी Verified DigiLocker खाते वापरावे, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते.

थोडक्यात, DigiLocker वेरिफिकेशन झालेले नसले तरी GATE 2027 चा फॉर्म भरता येणार आहे; मात्र परीक्षा केंद्रावर मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts