Jamui Women Safety : बिहारमधील जमुई जिल्ह्यात दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीन तरूण आणि तरूणीला संध्याकाळच्या सुमारास मारहाण करत छेडछाड करण्यात आली…याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं…यानंतर समस्तीपूर जिल्ह्यातील एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात काही नराधम एका तरूणीची छेडछाड करताना दिसत आहे..अशीच घटना बांका जिल्ह्यातूनही समोर आली…यामुळे बिहारमध्ये गुंडा गर्दी क्या करेंगी वर्दी? असा प्रश्न निर्माण झालाय…
त्यामुळे राज ठाकरे जे म्हणतात, युपी-बिहारचा लोंढा थांबवा, मुंबईत गर्दी वाढते, गुन्हेगारीच्या घटना घडतात, हे वाक्य खरंच ठरल्याचे दिसून येत आहे….बिहारमध्ये सध्या पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय…यातीलच काही लोक मुंबईत कामानिमित्त येतात…यामुळे मुंबईत गुन्हेगारींच्या घटनांमध्ये परप्रांतीयांचा हात असतो की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय…पाहूयात की राज ठाकरे परप्रांतीयाबाबत काय म्हणतात…मुंबईतील गुन्हेगारीच्या घटनांमागे कुणाचा हात असतो? बिहारमधील कायदा व्यवस्था एवढी का बिघडलीये
बिहारमध्ये जमुईच्या घटनेनंतर काय घडलं? ( Jamui Women Safety )
बिहारच्या जमुई जिल्ह्यात 19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुला-मुलीला काही तरूणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली..नंतर मुलीच्या अंगाला हात लावत आरोपींनी छेडछाड केली…या नराधमांनी हताश झालेल्या मुलीला बळजबरने ओढून नेण्याचा प्रयत्न केला, तर ती मुलगी हात जोडून स्वतःला आणि तिच्या मित्राला सोडण्याची विनवणी करत राहिली पण आरोपींना दया आली नाही…या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी तात्परतेने कारवाई करत आतापर्यंत मुख्य गुन्हेगारासह एकूण पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत…मात्र आरोपींची एवढी हिंमत का वाढते की ते थेट मुला-मुलीला दुचाकीवरून जात असताना अडवतात…त्यांना बेदम मारहाण करतात आणि त्यानंतर मुलीच्या अंगाला स्पर्श करतात…बिहारमधील भाजप सरकार नेमकं काय करत आहे? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच सांगतात की परप्रांतीयांचे लोढे रोखा…मुंबई आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांवर परराज्यातून येणाऱ्या अनियंत्रित लोंढ्यांमुळे प्रचंड ताण पडत असून, शहराची लोकसंख्या सांभाळण्याची क्षमता आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे, असा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी अनेक वेळा केलाय… मुंबईतील लोकल रेल्वे, रस्ते, पाणी आणि आरोग्य यंत्रणा या वाढत्या गर्दीमुळे कोलमडत असून, परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक मराठी तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी हिरावल्या जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे…राज ठाकरेंनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांवर कडक ‘परवाना पद्धत’ लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे… तसंच, अनेक गुन्हेगार परराज्यातून मुंबईत येतात, गंभीर गुन्हे करतात आणि पुन्हा स्वतःच्या राज्यात पळून जातात, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असं विधानही त्यांनी केलं आहे…
हेही वाचा : नॉनव्हेजमुळे हार्ट अटॅकचा धोका खरंच वाढतो? मांस खाताना या गोष्टींकडे लक्ष द्या
राज ठाकरे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर काय म्हणतात? ( Raj Thackeray )
आता राज ठाकरेंने जे गुन्हेगारीबाबत विधान केलंय त्यावर सध्या चर्चा करण्याची गरज आहे…कारण बिहारमधील सध्या परिस्थिती आपण पाहिली आहे…ज्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे…या घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील अनेक तरूणींनी संताप व्यक्त प्रतिक्रिया दिली आहे…बिहारमध्ये जी घटना आहे, खूपच दुर्दैवी घटना आहे…या घटनेमुळे आम्हाला भीती वाटते…एकट्या बाहेर पडल्यानंतर आमच्या मनात ही घटना येते आणि भिती वाटते…कारण प्रत्येकवेळी ग्रूपमध्ये तर फिरू शकत नाही..आम्ही जर अडचणीत दामिनी पथकला फोन केला, तर तो लवकर उचलण्यात यावा, अशी मागणी तरूणींनी केलीये…
बिहारमधील व्हायरल व्हिडिओ पाहून खूप वेदना झाल्या…मुलगी घरी जाईपर्यंत सुरक्षित नाही…पोलिसांचे हात सत्ताधारी बांधून ठेवतात…नाहीतर पोलीस योग्य कारवाई करतील…महाराष्ट्रातीलही मेट्रोसिटीतील परिस्थिती भयंकर आहे….देवा भाऊने याकडे लक्ष दिलं पाहिजे….त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे…या सरकारमध्ये फक्त घोषणा आणि जाहीरातबाजी पाहायला मिळते…बेटी किती सुरक्षित आहेत, फडणवीस साहेब बघा, फक्त बेटी बचाओ आणि पेढी पढाओचा नारा दिला जातो, अशी टीका महिलांच्या सुरक्षेवरून एका महिलेने केलीये…
सध्या बिहारमधील घटनेने देशभरात संताप असून अशा नराधमांना वेळीच रोखलं पाहिजे…त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागलीये…मुंबईतीलही काही गुन्हेगारींच्या घटनांमध्ये परप्रांतीयांचा हात पाहायला मिळतो…हे काही आरोपी येथे गुन्हा करून आपल्या राज्यात पळून जातात, त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड जाते…तुम्ही कोणत्या शहरात राहता आणि त्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का? कमेंट करून नक्की सांगा…









