• Home
  • ताज्या बातम्या
  • रितीका चोपडा ते सुचेता दलाल; पत्रकारितेतल्या 12 धाडसी महिला पत्रकार, ज्यांनी मोठे खुलासे केले
देश

रितीका चोपडा ते सुचेता दलाल; पत्रकारितेतल्या 12 धाडसी महिला पत्रकार, ज्यांनी मोठे खुलासे केले

Women Journalists in India
57

Women Journalists in India : रितीका चोपडा…इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकार…ज्यांच्या एका बातमीवर सध्या देशात वणवा पेटलाय, जगभरात त्यांच्या या बातमीची चर्चा सुरूय, भारताची स्वायंत्त संस्था म्हणून ओळखल्या जाणारा निवडणूक आयोगच या सगळ्यानं संशयाच्या पिंजऱ्यात उभा केलाय, निवडणूक आयुक्तांच्या मनमानीची बातमी रितीका चोपडा यांनी केली आणि संपूर्ण देशात राजकीय गदारोळ माजला, आजच्या सोशल मीडियाच्या जगात रितीका चोपडा या अवघ्या काही तासांत प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचल्या…पत्रकारिता करणं कठीण बनलेल्या काळात या धाडसी वाघिणीनं केलेल्या कामाला देशानं सलाम केला…पण भारतीय पत्रकारिता अनेक महिला पत्रकारांनी गाजवलीय, ज्यांना कधीच विसरु शकत नाही, आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात त्या फार चर्चेत नसल्या तरी त्यांच्या कामाची इतिहासात नोंद झालीय, पत्रकारितेतल्या अशा या धाडसी 12 वाघिणींची कहाणी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय…

महिला पत्रकारितेचा इतिहास पाहिल्यास 1991 हे वर्ष आणि सुचेता दलाल हे नाव कुठीच विसरु शकत नाही..

पत्रकारितेतल्या 12 धाडसी महिला पत्रकारांची कहाणी ( Women Journalists in India )

1. सुचेता दलाल ( Sucheta Dalal )
Moneylife Magazine च्या व्यवस्थापकीय संपादिका

धाडसी कामगिरी: १९९२ चा हर्षद मेहता शेअर बाजार घोटाळा उघडकीस आणण्याचे ऐतिहासिक श्रेय त्यांना जाते. याशिवाय त्यांनी ‘एन्ड्रॉन’ घोटाळाही समोर आणला. पत्रकारितेतील या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

2. रितीका चोपडा ( Ritika Chopra )
‘द इंडियन एक्सप्रेस’ मधील चीफ ऑफ नॅशनल ब्युरो

धाडसी कामगिरी: केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजातील अंतर्गत मतभेद, राजकीय दबाव आणि धोरणात्मक त्रुटींवर अत्यंत निर्भीडपणे आणि सखोलपणे रिपोर्टिंग करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. आत्ता देशभर त्यांचीच चर्चा होतेय.

हेही वाचा : पुण्यात IT Jobsची संधी! Accenture, Capgemini, TCSसह ‘या’ कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती; कोणत्या पदांसाठी संधी?

3.तनुश्री पांडे
स्वतंत्र पत्रकार आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर

धाडसी कामगिरी: उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे ग्राउंड रिपोर्टिंग त्यांनी केले होते. पीडितेचे शव पोलिसांनी मध्यरात्री जबरदस्तीने कशाप्रकारे जाळले, याचा त्यांनी थेट पर्दाफाश केला होता. या धाडसी शोधपत्रकारितेसाठी त्यांना २०२३ मध्ये प्रतिष्ठित ‘रामनाथ गोएंका पुरस्कार’ मिळाला.

4. ग्रीश्मा कुठार
तामिळनाडूतील स्वतंत्र पत्रकार आणि वकील

धाडसी कामगिरी: भारताच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील भागातून मणिपूरमधील नागा-कुकी संघर्ष ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. हिंदू राष्ट्रवाद, सत्ता-रचना, जातीयवाद आणि उपेक्षित समाजाच्या हक्कांच्या दडपशाहीवर त्या अतिशय धारदार आणि सखोल लेखन करतात.

5. ज्योती यादव
‘द प्रिंट’च्या असिस्टंट एडिटर

धाडसी कामगिरी: ग्रामीण भारत, महिलांचे शोषण आणि न्यायालयीन व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी अप्रतिम काम केले आहे. बिहारमधील ‘युटेरस स्कॅम’ म्हणजेच गर्भाशय घोटाळा आणि भंवरी देवी प्रकरणावरील त्यांच्या शोधमोहिमेसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘Faith and Fury: Covid Dispatches From India’s Hinterlands’ हे पुस्तकही लिहिले आहे.

6. पूनम आग्रवाल
ज्येष्ठ स्वतंत्र शोधपत्रकार, बीबीसी, द क्विंटच्या माजी संपादक

धाडसी कामगिरी: इलेक्टोरल बाँड्समधील छुपे अल्फान्युमेरिक कोड उघड करून राजकीय देणग्यांमधील गुप्तता त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणली. याशिवाय ईव्हीएममधील त्रुटी आणि लोन ॲप घोटाळ्यांवर त्यांनी केलेल्या शोध पत्रकारितेसाठी त्यांना ‘एमी पुरस्कार’ नामांकन मिळाले होते.

7. सुकन्या शांता
The Wire च्या वरिष्ठ सहाय्यक संपादक

धाडसी कामगिरी: भारतीय जेल प्रणालीतील मानवी हक्क उल्लंघन आणि जातिभेद यावर त्यांनी पुलित्झर सेंटरच्या मदतीने ५ भागांची मोठी मालिका प्रसिद्ध केली होती. त्यांच्या या रिपोर्टवर आधारित जनहित याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या जेल मॅन्युअलमध्ये बदल करण्याचा ऐतिहासिक आदेश दिला. एनआयएच्या केसेसमधील त्रुटींवर केलेल्या ‘द फोर्स्ड गिल्ट प्रोजेक्ट’साठी त्यांना २०२६ चा निडर पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला आहे.

8. नेहा दिक्षित
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्वतंत्र पत्रकार आणि लेखिका

धाडसी कामगिरी: बनावट पोलीस चकमकी, मानवी तस्करी आणि औषध कंपन्यांकडून गरिबांवर केले जाणारे बेकायदेशीर क्लिनिकल ट्रायल्स त्यांनी उघडकीस आणले. त्यांच्यावर अनेक खटले भरण्यात आले आणि धमक्या आल्या, तरीही त्या झुकल्या नाहीत. त्यांना ‘इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम अवॉर्ड’ आणि ‘चमेली देवी जैन पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांचे ‘The Many Lives of Syeda X’ हे पुस्तक प्रचंड गाजले आहे.

9. जतिंदर कौर तूर
२५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या ज्येष्ठ पत्रकार (द कारव्हान)

धाडसी कामगिरी: पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील पोलीस कोठडीतील मृत्यू, छळ आणि मानवाधिकार उल्लंघनावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जम्मूच्या राजौरी भागात लष्कराच्या ताब्यात असताना गुज्जर समाजाच्या लोकांचा झालेला छळ आणि मृत्यू यावर त्यांनी केलेल्या अत्यंत धाडसी कव्हरेजसाठी त्यांना ‘चमेली देवी जैन पुरस्कार’ (२०२५) देऊन गौरवण्यात आले.

10. बरखा दत्त
Mojo Story च्या संस्थापिका (माजी एनडीटीव्ही संपादक)

धाडसी कामगिरी: १९९९ मधील कारगिल युद्धाचे युद्धभूमीवरून थेट वार्तांकन करून त्यांनी इतिहास रचला. कोविड-१९ च्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी स्थलांतरित मजुरांचे संकट जगासमोर मांडले.

11. गौरी लंकेश
‘गौरी लंकेश पत्रिके’ या कन्नड साप्ताहिकाच्या धाडसी संपादिका

धाडसी कामगिरी: कट्टरतावाद, जातीयवाद आणि हुकूमशाही प्रवृत्तींविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. दुर्बल घटक आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी लेखणी हेच शस्त्र बनवले. २०१७ मध्ये त्यांच्या निर्भीड विचारांमुळे त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या भारतीय पत्रकारितेतील त्यागाचे सर्वोच्च प्रतीक आहेत.

12. राणा अयुब

स्वतंत्र पत्रकार आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या जागतिक स्तंभलेखिका
धाडसी कामगिरी: ‘तहलका’ मासिकात असताना त्यांनी छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने गुजरात दंगलींमधील राजकारणी आणि नोकरशहांचा सहभाग उघड केला, ज्यावर त्यांनी ‘गुजरात फाइल्स’ हे गाजलेले पुस्तक लिहिले.

Indian Journalism : या आहेत, त्या 12 धाडसी वाघिणी ज्यांच्या बातम्यांनी देश हादरवून सोडला, ज्यांच्या बातम्यांच्या आधारे ब्रेकिंवर ब्रेंकिंग न्यूज बनत राहिल्या, अशा अजूनही अनेक महिला पत्रकार आहेत, ज्यांची कामगिरी अतिशय उत्तम आहे, अलिकडे जिकडे सत्ता तिकडे अनेकांचा पत्ता स्थिती असल्यानं पत्रकारिता बदनाम झालीय, मात्र ती संपली नाही, ते रितीका चोपडा यांनी पुन्हा दाखवून दिलंय, भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ अजूनही आपलं काम मजबूतीनं करतोय, जीवाची पर्वा न करता, कोणत्याही दबावाला न जुमानता लढतोय, त्या सगळ्यात या महिलांचं मोठं योगदान आहे, काहींनी त्याचा पाया रचलाय, तर रितीकासारख्या काही पत्रकार त्या वारसा पुढे नेतायत, सरकार आणि व्यवस्थेला घाम फोडतायत…तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts