29 September 2026 Horoscope: आज २९ सप्टेंबर, मंगळवारचा दिवस काही राशींसाठी रखडलेली कामं पूर्ण होण्यासोबतच आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत सकारात्मक ठरू शकतो. ग्रह- नक्षत्रांच्या प्रभावामुळे कोणत्या राशींना मिळणार संधी आणि कोणाला घ्यावी लागणार काळजी? जाणून घ्या आजचं राशिभविष्य.
Today Horoscope 29 September 2026: आज २९ सप्टेंबर, मंगळवार. काही राशींसाठी आजचा दिवस नवीन संधी (Astrology Today) घेऊन येऊ शकतो. कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता असून आर्थिक व्यवहारांमध्ये काहींना दिलासा मिळू शकतो (September 29 Horoscope). मात्र, काही राशींनी खर्च, आरोग्य आणि कौटुंबिक विषयांमध्ये अधिक सावध राहणे (Daily Horoscope) आवश्यक आहे. चला तर मेष ते मीन या राशींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी (Today Horoscope 29 September 2026) कसा असेल, जाणून घेऊया. (Marathi Rashibhavishya)
मेष
आज मेष राशीसाठी उत्साह वाढवणारा ठरू शकतो. एखादे महत्वाचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असेल तर त्याला आज गती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ किंवा अनुभवी लोकांकडून मिळणारा सल्ला कामी येईल. पैशांशी संबंधित निर्णय घेताना घाई करू नका. घरातील मंडळींसोबत एखाद्या विषयावर मनमोकळा संवाद होऊ शकतो.
वृषभ
या राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या वेळेचे योग्य नियोजन करावे. एकाच वेळी अनेक कामे हाती घेतल्यास गोंधळ होऊ शकतो. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा संपर्क मिळण्याची मोठी शक्यता आहे. तसेच घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी अनावश्यक वाद टाळा. आणि आरोग्याच्या दृष्टीने विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन
या जातकांसाठी आज कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. एखादे महत्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दबाव जाणवला तरी चांगल्या नियोजनामुळे काम पूर्ण करता येईल. आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.तसेच मित्र किंवा सहकाऱ्यांची मदत महत्वाच्या वेळी उपयोगी पडेल.
कर्क
आज आर्थिक बाबतीत काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याची संधी मिळू शकते. व्यवसायातील एखादा रखडलेला व्यवहार पुढे सरकण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळू शकते. कुटुंबातील वातावरणही समाधानकारक राहण्याची शक्यता आहे.
सिंह
आजचा दिवस तुम्ही नियोजनावर भर देण्याचा आहे. अचानक आलेल्या खर्चामुळे आर्थिक गणित बदलू शकते. त्यामुळे एखादी खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. मुलांशी संबंधित एखादा विषय चर्चेत येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी मात्र एखादे महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने समाधान मिळू शकते.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज प्रगतीचे संकेत आहेत. बराच काळ प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. कार्यालयात तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात परस्पर समजूत वाढण्याची शक्यता आहे.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींना आज खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. घर, वाहन किंवा वैयक्तिक गरजांशी संबंधित अचानक खर्च येऊ शकतो. पैशांबाबत कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. मनात एखाद्या विषयाबाबत संभ्रम असल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. शांतपणे घेतलेला निर्णय फायदेशीर ठरू शकतो.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आज कामात बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. निष्काळजीपणामुळे एखादी छोटी चूक होऊ शकते. सहकाऱ्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणाशी संबंधित व्यक्तींना अभ्यासात चांगली एकाग्रता साधता येऊ शकते. मेहनतीचे सातत्य कायम ठेवा.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींना आज काही आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात. एखाद्या अपेक्षित कामाला विलंब झाल्याने सुरुवातीला नाराजी होऊ शकते. मात्र, परिस्थितीवर शांतपणे विचार केल्यास मार्ग सापडेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी ठराविक वेळापत्रक तयार करावे. कुटुंबातील मतभेद वाढू नयेत यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल.
मकर
आज करिअरच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन एखादी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. मात्र, सहकाऱ्यांशी व्यवहार करताना संयम बाळगा आणि वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. योग्य संधीचा फायदा घेण्यासाठी आत्मविश्वास कायम ठेवा.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज आर्थिक बाबतीत सावध पवित्रा ठेवावा. अनपेक्षित खर्चामुळे बचतीवर परिणाम होऊ शकतो. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामासोबत विश्रांतीलाही वेळ द्या. एखाद्या जुन्या कामाचा पाठपुरावा केल्यास त्यात प्रगती मिळण्याची शक्यता आहे.
मीन
मीन राशीसाठी आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. कामानिमित्त प्रवास किंवा अतिरिक्त धावपळ होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी आल्या तरी त्या हळूहळू कमी होतील. योग्य नियोजनामुळे महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील. कुटुंबातील व्यक्तींकडून मिळणारे सहकार्य तुमचा ताण कमी करू शकते.









