Smit Machchhar News: ३२ हजार फूट उंचीवर स्मित मच्छार यांच्या जीवावर बेतलेली परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तातडीने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्या थरारक प्रसंगाचा अनुभव सांगितला असून, काही सेंकंदाचा विलंबही जीवघेणा ठरला असता, अशी माहिती त्यांनी दिली.
Smit Machchhar Dr Shota Musaev Emotional: विमानाच्या तब्बल ३२ हजार फूट उंचीवर घडलेल्या थरारक प्रसंगात गंभीर जखमी झालेल्या पायलट कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar Pilot) यांना वैद्यकीय मदत करणाऱ्या डॉक्टरांनी त्या घटनेचा अनुभव सांगितला आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रसंगात विमानातील परिस्थिती (Plane Hijack Incident) किती गंभीर होती, याचा अंदाज येतो. हा अनुभव सांगताना डॉक्टरांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
विमानात अचानक निर्माण झाली जीवघेणी परिस्थिती
कॅप्टन स्मित मच्छार हे दीर्घकाळापासून विमानसेवेत (Smit Machchhar Plane Incident) कार्यरत आहेत. विमानातील कथित हायजॅकच्या प्रयत्नादरम्यान त्यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
विमानातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना डॉ. यांनी प्रवाशांना मदत करण्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या नजरेस एक गंभीर पायलट पडला.
हेही वाचा: हेल्दी समजून रात्री ब्लॅक कॉफी पिताय? तर ही सवय पडू शकते महागात, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
सहवैमानिकाला वाचवण्यासाठी प्रवाशांचा प्रयत्न
डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. कॅप्टन मच्छार आणि आणखी एका प्रवाशाने उपलब्ध हेडफोनच्या मदतीने सहवैमानिकाचे हात बांधण्याचा प्रयत्न केला होता.
या गोंधळाच्या परिस्थितीत संशयित व्यक्तीला नियंत्रणात घेण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पुढील विरोध केला नसल्याचे डॉ. मुसायेव यांनी सांगितले.
कॅप्टन मच्छार यांच्यावर तातडीने उपचार
यानंतर डॉक्टरांनी कॉकपिटमध्ये जाऊन कॅप्टन मच्छार यांची स्थिती तपासली. त्यांच्या डोक्याला, मानेला आणि हाताला दुखापत झाली होती. जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने जखमांवर दाब देत रक्तस्राव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी कॅप्टन मच्छार यांनी आपल्याला वाचवण्याची विनंती केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना धीर देत उपचार सुरू ठेवण्यात आले.
“आपण मृत्यूच्या अगदी जवळ होतो…”
या घटनेचा अनुभव सांगताना डॉ. शोटा मुसायेव भावुक झाले. ३२ हजार फूट उंचीवर विमानात घडलेल्या त्या प्रसंगात काही सेकंदांचा फरकही परिस्थिती बदलू शकला असता, असे त्यांनी सांगितले.
“आपण मृत्यूच्या फक्त काही सेकंदांवर होतो,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. आपल्या वैद्यकीय कारकिर्दीतील हा अत्यंत भीषण अनुभव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवले
घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांना सौदी अरेबियामध्ये प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना संयुक्त अरब अमिरातीमधील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.
विमानातील त्या प्रसंगात कॅप्टन मच्छार यांना वेळेवर मिळालेली वैद्यकीय मदत महत्त्वाची ठरली. या संपूर्ण घटनेचा अनुभव सांगताना डॉ. मुसायेव भावुक झाल्याने त्या रात्रीची भीषणता पुन्हा अधोरेखित झाली.






