Breaking News :
  • Home
  • एजुकेशन- जॉब
  • MPSC आंदोलनाचा ‘कोल्हापुरी फटाका’! कोण आहे विवेकानंद पाटील? शिक्षण, कुटुंब अन् संघर्षाची कहाणी
महाराष्ट्र

MPSC आंदोलनाचा ‘कोल्हापुरी फटाका’! कोण आहे विवेकानंद पाटील? शिक्षण, कुटुंब अन् संघर्षाची कहाणी

Vivekanand Patil MPSC
10

Vivekanand Patil MPSC : विवेकानंद पाटील हा तरूण सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे…गेल्या काही दिवसांपासून MPSC चे विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहे…MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागणी विद्यार्थी करत आहे…मात्र याच आंदोलनात विवेकानंद हा तरूण आपल्या तुफान फटाकेबाजीने सरकारला आणि भीमनवार यांना धारेवर धरत आहे…त्याची गावाकडची भाषा महाराष्ट्रातील जनतेला भूरळ घालत आहे…पण सर्वांना आपल्या वक्तव्याने भूरळ घालणारा विवेकानंद पाटील ( Vivekanand Patil ) हा किती श्रीमंत आहे? त्याचे शिक्षण किती झाले आहे? सध्या कमाईचे काय काय साधन आहे?

विवेकानंद पाटील कोण आहे? ( Vivekanand Patil )

एका बाजूला पुण्याच्या रस्त्यांवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो तरुण-तरुणींचा बुलंद आवाज बनून समोर आलेला विवेकानंद मारुती पाटील हा कोल्हापूरचा आहे….करवीर तालुक्यातील कुरुकली गावचा रहिवासी आहे…त्याच्या तुफान फटाकेबाजीने आज MPSC चे आंदोलन घराघरात पोहोचले आहे…राज्यभरातून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे…तसंच अनेक नेते देखील आंदोलन स्थळाला भेट देऊन जात आहे…नेते देखील विवेकानंद पाटील यांच्या वक्तव्याचे फॅन होताना दिसत आहेत..

अत्यंत सामान्य आणि गरिबीच्या पार्श्वभूमीतून आलेल्या विवेकानंदचे वडील मारुती पाटील हे गावचे अल्पभूधारक शेतकरी आहेत…तर आई गृहिणी आहे… अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विवेकानंदच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची लहान बहीणही सध्या एमपीएससी परीक्षेची कसून तयारी करत आहे…विवेकानंदच्या एका बहिणीचे लग्न झाल्याची माहिती आहे..
अत्यंत संघर्षातून आणि शेतमजुरी करून वडिलांनी त्याला शिक्षणासाठी पाठवले… घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही विवेकानंदने आपल्या ध्येयाशी कधीही तडजोड केली नाही… त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच झाले… त्यानंतर त्याने कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयात विशेष प्राविण्यासह आपली पदवी पूर्ण केली…राज्यशास्त्राचा सखोल अभ्यास असल्यामुळेच त्याला देशाचे कायदे, राज्यघटना आणि प्रशासकीय बाबींचे उत्तम ज्ञान अवगत झाले.. पुढे IAS/IPS होण्याचे स्वप्न डोळ्यात बाळगून तो पुण्यात आला आणि सध्या तो मराठी माध्यमातून UPSC मुख्य परीक्षेचीही तयारी करत आहे…त्याने दोन वेळा MPSC चा पेपर दिल्याची माहिती आहे…पण दोन्ही वेळा त्याला अपयश आलंय…

हेही वाचा : नवरात्रोत्सवाची लगबग सुरू; कोल्हापूर प्रशासनाने आखला गर्दी-पार्किंगचा ‘मास्टर प्लॅन’

विवेकानंद पाटीलचे शिक्षण किती? ( Vivekanand Patil MPSC )

आर्थिक श्रीमंतीचा विचार केला, तर युवा आंदोलक विवेकानंदकडे कोणतीही फार मोठी संपत्ती नाही…. तो पुण्यात एका छोट्या खोलीत मित्रांसोबत राहून अत्यंत साधेपणाने अभ्यास करतो, अशी माहिती आहे… त्याची खरी श्रीमंती म्हणजे त्याची अभ्यासातील हुशारी, धारदार वकृत्वशैली आणि महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे त्याला लाभलेले खंबीर समर्थन हीच आहे.. एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षार्थींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात झालेल्या ऐतिहासिक आंदोलनादरम्यान त्याने केलेल्या धडाकेबाज आणि अभ्यासपूर्ण भाषणांमुळे तो एका रात्रीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशझोतात आला. “आम्ही पुण्यात अधिकारी व्हायला आलोय, राजकारण करायला नाही,” हा त्याचा संवाद राज्यभर प्रचंड गाजला आणि त्याच्या याच आंदोलकीय पवित्र्यामुळे थेट सरकारला नमून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या…

पुण्यात आंदोलनस्थळी विवेकानंद पाटीलने जेव्हा हातात माईक घेतला, तेव्हा त्याच्या अस्सल कोल्हापुरी ठसक्याने आणि उपरोधिक टोल्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला आणि पोलिसांनाही हसू आवरले नाही… राज्यात सुरू असलेल्या पेपरफुटीच्या सत्रावर आणि राजकीय परिस्थितीवर त्याने अत्यंत बोचरी टीका केली..विवेकानंद आपल्या भाषणात म्हणाला, “महाराष्ट्रात आमदार फुटले, खासदार फुटले, राजकीय पक्ष फुटले, त्याचे आम्हाला इतके दुःख झाले नाही… पण जेव्हा आमचा लाखो विद्यार्थ्यांचा MPSC चा पेपर फुटला, तेव्हा आम्हाला वाटले जणू आम्हा गरिबांच्या लेकरांचे आभाळच फाटले आहे… आम्ही शेतकरी आणि गोरगरिबांची मुले आहोत… 50-50 लाख रुपये देऊन वशिल्याने नोकऱ्या विकत घेण्याची आमची कुवत नाही…” राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमधील फुटीचा संदर्भ देत, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच त्याने “तुमचे पक्ष फुटले आणि आमचा पेपर फुटला, आता आपण सगळे समदु:खी आहोत,” असा टोला लगावल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली…

घर देण्याची घोषणा; विवेकानंदने काय उत्तर दिलं?

विवेकानंद पाटील पुण्यात एका छोट्या खोलीत मित्रांसोबत राहून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो… त्याच्या याच संघर्षाची दखल घेत आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते विश्वजीत कदम आणि रोहित पवार यांनी विवेकानंदला हक्काचे घर बांधून देण्याची घोषणा केली… मात्र, यावर अत्यंत स्वाभिमानी उत्तर देत विवेकानंद म्हणाला, “मला स्वतःसाठी घर नको आहे. माझी मुदत संपत आली आहे, पण माझ्यासोबत रस्त्यावर बसलेल्या या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे… शासनाने आधी माझ्या या सर्व भाऊ-बहिणींच्या मागण्या मान्य कराव्यात आणि एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले, की माझे घर मला मिळाल्यासारखेच आहे…त्यामुळे आता सरकार MPSC च्या अध्यक्षांना हटवत विद्यार्थ्यांना न्याय देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts