Flipkart Eat-in by Minutes Food Delivery: ऑनलाईन शॉपिंगनंतर आता flipkart फूड डिलिव्हरी क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘Eat-in by Minutes’ या नव्या सेवेद्वारे कंपनी Zomato आणि Swiggy ला टक्कर देणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत अधिक सविस्तर माहिती.
Flipkart Eat-in by Minutes Food Delivery: ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी Flipkart कंपनी आता फूड डिलिव्हरी क्षेत्रात नशीब अजमावण्याच्या तयारीत आहे. ‘Eat-in by Minutes’ या नव्या सेवेद्वारे कंपनी Zomato आणि Swiggy या लोकप्रिय फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मना ( Flipkart Food Delivery) टक्कर देणार आहे. ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस ही सेवा ग्राहकांसाठी सुरू करण्याची योजना ( Flipkart Food App ) असल्याचे वृत्त आहे. कमी कमिशनच्या मॉडेलमुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी हा नवा पर्याय ठरू शकतो.
बंगळुरूमधून सेवेचा श्रीगणेश
Flipkart आपल्या नव्या फूड डिलिव्हरी सेवेची सुरुवात बंगळुरूमधून करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला कंपनीच्या मुख्यालयातून या सेवेची चाचणी सुरू असून, त्यात कंपनीचे कर्मचारी सहभागी होत आहेत. या चाचणीमध्ये सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही सेवा सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. कंपनीच्या विद्यमान ग्राहकवर्गाचा आणि डिलिव्हरी नेटवर्कचा फायदा घेऊन फूड डिलिव्हरी बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याचा Flipkart चा प्रयत्न असेल.
ग्राहकांना अॅपवरून करता येणार खाद्यपदार्थांची ऑर्डर
‘Eat-in by Minutes’ या सेवेसाठी ग्राहकांना Flipkart अॅपमध्ये स्वतंत्र फूड डिलिव्हरी विभाग उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ सिलेक्ट करून ऑर्डर करता देखील येते.
डिलिव्हरीसाठी कंपनी आपल्या विद्यमान लॉजिस्टिक्स नेटवर्कचा वापर करण्यावर भर देत आहे. यामुळे ऑर्डर पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
या प्लॅटफॉर्मवर Open Network for Digital Commerce ( ONDC ) शी जोडलेली रेस्टॉरंट्स तसेच Flipkart सोबत थेट भागीदारी करणाऱ्या रेस्टॉरंट्सनाही संधी मिळू शकते.
२०२६ अखेरपर्यंत सहा शहरांमध्ये विस्ताराची योजना
बंगळुरूमध्ये सुरुवात केल्यानंतर Flipkart ची ही सेवा टप्प्याटप्प्याने इतर शहरांमध्ये विस्तारण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत सहा शहरांमध्ये सेवा पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या विस्तारासाठी कोणती शहरे निवडली जाणार आणि प्रत्येक शहरात सेवा नेमकी कधी सुरू होणार, याबाबत अधिकृत तपशील महत्त्वाचा ठरणार आहे.
रेस्टॉरंट्सकडून किती कमिशन आकारले जाणार?
Flipkart च्या नव्या फूड डिलिव्हरी सेवेमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे रेस्टॉरंट्ससाठी प्रस्तावित असलेले कमी कमिशन मॉडेल.
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे अध्यक्ष सागर दरयानी यांच्या म्हणण्यानुसार, Flipkart ने रेस्टॉरंट्ससाठी सुमारे १० टक्के बेस कमिशन प्रस्तावित केले आहे.
याउलट, Zomato आणि Swiggy या कंपन्यांकडून रेस्टॉरंट्सना साधारणपणे २० ते २५ टक्क्यांपर्यंत कमिशन आकारले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे Flipkart चे प्रस्तावित मॉडेल रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी आकर्षक ठरू शकते.
मात्र, १० टक्के हे केवळ प्रस्तावित बेस कमिशन आहे. जाहिराती, सवलती आणि इतर शुल्कांचा समावेश केल्यानंतर रेस्टॉरंट्सचा प्रत्यक्ष खर्च वाढू शकतो.
हेही वाचा: Skin Care Tips: सणासुदीत चेहऱ्यावर हवा नॅचरल ग्लो? झोपण्यापूर्वी फॉलो करा ‘हे’ ४ स्किन केअर टिप्स!
Zomato आणि Swiggy समोर नवे आव्हान
भारतातील फूड डिलिव्हरी बाजारपेठेत Zomato आणि Swiggy यांचे मोठे स्थान आहे. अशा परिस्थितीत Flipkart ची एन्ट्री झाल्यास स्पर्धेला नवे वळण मिळू शकते.
Flipkart कडे असलेला मोठा ग्राहकवर्ग, तंत्रज्ञान आणि डिलिव्हरी नेटवर्क ही कंपनीची जमेची बाजू ठरू शकते. त्याचबरोबर कमी कमिशनच्या प्रस्तावामुळे रेस्टॉरंट्सना नव्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्याची संधी मिळू शकते.
आता ‘Eat-in by Minutes’ सेवा प्रत्यक्षात किती यशस्वी ठरते, ग्राहकांना कोणत्या सुविधा आणि ऑफर्स मिळतात आणि Zomato व Swiggy या स्पर्धेला कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



