• Home
  • Pune
  • आव्हाडांना गोळ्या घालण्याची धमकी, पुण्यात भाड्याने राहणारा सिक्युरिटी सुपरवायझर पोलिसांच्या जाळ्यात!
महाराष्ट्र

आव्हाडांना गोळ्या घालण्याची धमकी, पुण्यात भाड्याने राहणारा सिक्युरिटी सुपरवायझर पोलिसांच्या जाळ्यात!

Jitendra Awhad Threat
7
Jitendra Awhad Threat: आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल माधवराव बिच्चेवाड याला पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नेमकं प्रकरण काय? चला तर जाणून घेऊयात.

Jitendra Awhad Threat: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल माधवराव बिच्चेवाड याला पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तीला पुढील कारवाईसाठी ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशाल हा पुण्यात भाड्याच्या घरात राहत असून, तो सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Boyfriend-Girlfriend चा Birthday बनवा स्पेशल! या हटके सरप्राईजने जिंका पार्टनरचं मन

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरच्या रात्री जितेंद्र आव्हाड यान वारंवार फोन आणि मेसेज करून धमकावण्यात आले होते. फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सध्या तक्रार दाखल करण्यात आली.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने आव्हाड यांच्या घराबाहेर आल्याचे सांगत त्यांना लक्ष्य करण्याची भाषा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला.

टीव्हीवरील बातमी पाहून घरमालकाला संशय

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, आव्हाड यांना धमकी दिल्याची बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर पुण्यातील घरमालकाला आपल्या भाडेकरूबद्दल संशय आला. बातमीत समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आपल्याकडे भाड्याने राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा: Skin Care Tips: सणासुदीत चेहऱ्यावर हवा नॅचरल ग्लो? झोपण्यापूर्वी फॉलो करा ‘हे’ ४ स्किन केअर टिप्स!

त्यानंतर घरमालकाने विशाल बिच्चेवाड याला लोणीकंद पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. लोणीकंद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी पुण्यात येऊन पुढील कारवाईसाठी त्याचा ताबा घेतला.

जितेंद्र आव्हाड यांनीही व्यक्त केली होती नाराजी

धमकीच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. त्यांना फोन करून धमकावण्यात आल्याचा तसेच संबंधित व्यक्ती आपल्या घराच्या दरवाजाजवळ असल्याचे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनीही संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनादेखील धमकी देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई केली.

हेही वाचा: Zomato-Swiggy चं टेन्शन वाढणार! Flipkart आणतेय ‘Eat-in by Minutes’ फूड डिलिव्हरी सेवा

पोलिसांकडून पुढील तपास

या प्रकरणात विशाल माधवराव बिच्चेवाड याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेत नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देण्यामागील नेमके कारण काय, यासह इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts