• Home
  • ताज्या बातम्या
  • आळंदी यात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त! महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी
महाराष्ट्र

आळंदी यात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त! महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी

Alandi Yatra 2026
2
Alandi Yatra 2026 :  आळंदी यात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस, विश्रामगृहे, भोजनगृहे आणि सीसीटीव्ही व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

After Kartiki Wari Warkari Came to Alandi :  कार्तिकी वारीनंतर आता वारकऱ्यांना आळंदी यात्रेचे वेध लागले आहेत. येत्या ४ सप्टेंबर रोजी आळंदीची यात्रा होणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. विशेषतः महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, महिला पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

यात्रेदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या विश्रामगृहांमध्ये तसेच भोजनगृहांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर पोलिसांना लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची विशेष नजर

आळंदी यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला आणि पुरुष वारकरी मोठ्या संख्येने येतात. यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या देखील लक्षणीय असते. (Women’s Safety)त्यामुळे यात्रेदरम्यान महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी महिला पोलिसांची विशेष नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच महिला वारकऱ्यांची वर्दळ असलेल्या परिसरात पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

मंदिर परिसरात पोलीस आणि सीसीटीव्हीची नजर, अतिरिक्त पोलीस तुकडी

यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेच्या ठिकाणीही सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. वारकऱ्यांच्या विश्रामगृहांसह भोजनगृहांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या माध्यमातून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारपासून अतिरिक्त पोलिसांची तुकडी आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. (Police and cctv On eye)देऊळवाडा, इंद्रायणी नदी घाट, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग या महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देवस्थान समितीकडूनही यात्रेच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक तयारी केली जात आहे.

हेही वाचा : Difference Between Ashadhi and Kartiki Ekadashi : आषाढीला देव झोपतात, तर कार्तिकीला जागे होतात? जाणून घ्या दोन्ही एकादशींमधील महत्त्वाचा फरक

गर्दीचे नियोजन आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

आळंदी यात्रेदरम्यान मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट आणि प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीचे नियोजन, महिला वारकऱ्यांची सुरक्षा आणि परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे ही प्रशासनासमोरील महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.(crowd management and the safety of Warkaris) यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी पोलीस आणि देवस्थान समितीकडून तयारी केली जात आहे.

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

img

Shivani

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts