Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • AIIMS कडून 1484 पदांसाठी मेगा भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि वयोमर्यादा
Top News

AIIMS कडून 1484 पदांसाठी मेगा भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि वयोमर्यादा

AIIMS Recruitment 2026

AIIMS Recruitment 2026: आता सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. AIIMS ने 1484 पदांसाठी मेगा भरती जाहीर केली असून, या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया काय आहे, ते जाणून घेऊया.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) ने कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE)-५ अंतर्गत ग्रुप B आणि ग्रुप C श्रेणीतील विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशातील विविध AIIMS संस्था तसेच इतर आरोग्यविषयक संस्थांमधील 1484 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२६ आहे.

हेही वाचा : स्लोव्हाकियात पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत; रॉबर्ट फिको यांच्याकडून विशेष कौतुक

कोणत्या पदांसाठी भरती होणार?

या भरती प्रक्रियेत प्रशासकीय, तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सपोर्ट, लिपिकीय आणि इतर अनेक विभागांतील पदांसाठी समावेश आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा किंवा संबंधित पदासाठी आवश्यक असलेली इतर पात्रता पूर्ण केलेली असावी. पदनिहाय पात्रतेचे निकष वेगळे असलेयाने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

भरतीतील विविध पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27, 30 किंवा 35 वर्षे ठेवण्यात आली आहे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे सवलत
OBC प्रवर्ग: 3 वर्षे सवलत
PwBD (दिव्यांग) उमेदवार: 10 वर्षे सवलत
अर्ज शुल्क

उमेदवारांनी खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल:

शुल्क

General / OBC 3,000 रु
SC / ST / EWS 2,400 रु

परीक्षा कशी होईल?

निवड प्रक्रियेसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) घेतली जाईल. परीक्षेत एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

विषय

सामान्य ज्ञान
संगणक ज्ञान
संबंधित विषयाचे तांत्रिक ज्ञान

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड CBT परीक्षेतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा 25 ते 27 जुलै 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. प्रवेशपत्र आणि परीक्षेशी संबंधित इतर माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

AIIMS च्या www.aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
नवीन उमेदवार म्हणून नोंदणी करा.
अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाइन शुल्क भरून अर्ज पूर्ण करा.
अंतिम सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करून ठेवा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts