Telegram Ban India: NEET-UG री-एग्झाम २१ जून रोजी होणार असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टेलिग्रामवरील काही सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
NEET UG Re- Exam २०२६ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याचे फीचरही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याचे फिचरही बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाचे राष्ट्र्रीय परीक्षा संस्था (NTA) ने स्वागत केले आहे.
हेही वाचा : AIIMS कडून 1484 पदांसाठी मेगा भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि वयोमर्यादा
केंद्र सरकारकडून तयारीला वेग
केंद्र सरकारने २१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी (NEET-UG) पुनर्परीक्षेची तयारी जोरदार सुरु आहे. NEET-UG पेपर फुटी प्रकरणामुळे मे महिन्यात झालेली ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी नुकटीच येथे एनटीए (NTA) अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
यावेळी, परीक्षा प्रक्रियेच्या निष्पक्षतेत अडथळा आणण्याचा किंवा त्यात कोणत्याही प्रकारे फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.
कडक सुरक्षा उपाययोजना
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेतली जाईल. तसेच, परीक्षा केंद्रांवर सुरक्षा आणि प्रशासनासाठी सीआरपीएफ (CRPF) आणि सीआयएसएफ (CISF) जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे.
परीक्षेत महत्त्वाचे बदल
NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा ही २१ जून रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार NTA ने काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत.
यंदा परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत म्हणजेच एकूण १९५ मिनिटे चालणार आहे. या कालावधीत परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतरच्या आवश्यक औपचारिकतांचाही समावेश असेल.
विद्यार्थ्यांसाठी अधिक माहिती
विद्यार्थ्यांना गणिती किंवा इतर सोडवणुकीसाठी अधिक सुविधा मिळावी म्हणून प्रश्नपत्रिकेमधील रफ वर्कसाठीची जागा दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त 2 पाने उपलब्ध होती, तर आता 4 पाने दिली जाणार आहेत. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अधिक सोयीस्कर आणि तणावमुक्त वातावरणात देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











