Saturn Retrograde 2026: शनिग्रह लवकरच वक्री होणार असून त्याचा परिणाम काही राशींवर सकारात्मक दिसू शकतो. विशेषतः या ३ राशींसाठी १३८ दिवस म्हणजे दिवाळीपर्यंतचा काळ हा अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आयुष्यात अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत. तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना करिअर आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिग्रह लवकरच वक्री (उलट्या दिशेने) चालू लागणार आहे, आणि या बदलाचा काही राशींवर विशेष सकारात्मक परिणाम दिसून येईल. विशेषतः तीन राशींना या कालावधीत मोठा आर्थिक आणि व्यावसायिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा काळ सुमारे 138 दिवसांचा असेल, ज्यात कमाईच्या संधी वाढतील आणि अनेक अडथळे दूर होतील.
हेही वाचा: नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक पोह्याचे थालीपीठ; साहित्य आणि कृती जाणून घ्या एका क्लिकवर!
हिंदू श्रद्धेनुसार, शनिदेवांना कर्मफळाचे दाते आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीच्या कृतीनुसार ते फळ देतात. चांगल्या कर्मांना उत्तम परिणाम, तर वाईट कर्मांना शिक्षा. त्यामुळे शनिच्या गतीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या जीवनावर काही ना काही प्रभाव टाकतात.
यंदा शनि 27 जुलै ते 11 डिसेंबर या काळात वक्री राहणार असून, या 138 दिवसांच्या कालावधीत काही राशींना विशेष लाभ होणार आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी कमी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आरोग्याच्या तक्रारींमध्येही आराम मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून एकूणच परिस्थिती सकारात्मक राहील.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळू शकतो. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळू शकते. परदेशात काम करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ ठरू शकतो.
कुंभ (Aquarius)
या राशीसाठीही शनिचा वक्री काळ लाभदायक मानला जात आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बढती मिळू शकते. घर किंवा वाहन खरेदीसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. तसेच धार्मिक प्रवासाची संधी मिळू शकते.









